Raj Thackeray | पुण्यात राज ठाकरे गरजणार, कोणावर बरसणार?

राज ठाकरे यांनी (Raj Thackeray) आपला अयोध्या दौरा (Ayodhya Tour) रद्द केला. त्यामुळे आता सगळ्यांच्या नजरा या पुण्यातल्या राजसभेकडे.  

Updated: May 20, 2022, 07:24 PM IST
Raj Thackeray | पुण्यात राज ठाकरे गरजणार, कोणावर बरसणार? title=

पुणे :  राज ठाकरे यांनी (Raj Thackeray) आपला अयोध्या दौरा (Ayodhya Tour) रद्द केला. त्यामुळे आता सगळ्यांच्या नजरा या पुण्यातल्या राजसभेकडे. लागल्यात आहेत. अयोध्या वारीपासून ते विरोधकांच्या टीकेपर्यंत राज ठाकरे सगळ्यांचा समाचार घेतील, अशी अपेक्षा आहे. या सभेत राज ठाकरे कुणावर निशाणा साधणार? जाणून घेऊयात. (mns chief raj thackeray meeting will be held in ganesh kala manch at pune on 22 may morning)

राज ठाकरे यांचा बहुचर्चित अयोध्या दौरा स्थगित झालाय. त्याबाबत पुण्यातला सभेत सविस्तर बोलूच, असं राज ठाकरेंनी जाहीर केलंय. विरोधकांनी 'तूर्तास स्थगित'चा अर्थ लावताना नवनवीन राजकीय शोध लावू नयेत ! सर्वांचा चोख हिशोब केला जाईल, पुण्यात असंही मनसेनं स्पष्ट केलंय. 

त्यामुळं येत्या रविवारी पुण्यातल्या गणेश कला मंच सभागृहात होणाऱ्या सभेत राज ठाकरे कुणाचा हिशोब करणार, याची उत्सूकता शिगेला पोहोचली आहे.

बुडाला औरंग्या पापी, म्लेंछसंव्हार जाहाला|
मोडलीं मांडली छेत्रें, आनंदवनभुवनी||

अशा ओळी मनसेनं सभेच्या पोस्टरवर छापल्यात. याचा अर्थ औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेल्या राजकारणावर घणाघाती हल्ला चढवण्याची रणनीती मनसेनं आखली आहे. 

राज ठाकरेंच्या निशाण्यावर कोण?

औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहणारे ओवैसी राज ठाकरेंच्या रडारवर असतील. अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचाही ते समाचार घेतील.

भगवी शाल पांघरून फिरणारे मुन्नाभाई अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी खिल्ली उडवली होती. त्याला राज ठाकरे काय प्रत्युत्तर देणार, याची उत्सूकता आहे. शिवाय पुण्यात सभा असल्यानं शरद पवार आणि अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेस राज ठाकरेंच्या निशाण्यावर असणाराय.

खरं तर आधी पुण्यातल्या नदीपात्रात 21 जूनला राज ठाकरेंची सभा होणार होती. मात्र पावसाची शक्यता लक्षात घेऊन मनसेनं बंदिस्त हॉलमध्ये ही सभा घ्यायचं ठरवलं. शिवाय पहिल्यांदाच संध्याकाळऐवजी सकाळी 10 वाजता ही सभा होणार आहे. त्यामुळं रविवारी सकाळी सकाळीच राज ठाकरे काय फर्मान सोडणार, याकडं सगळ्यांचं लक्ष असणाराय.