MNS on Pakistani Celebraties in Bollywood: सध्या बॉलिवूडमध्ये मोठमोठ्या कलाकारांच्या चित्रपटांचे बारा वाजलेले पाहायला मिळाले. हे वर्ष बॉलिवूडसाठी (bollywood news) अत्यंत आव्हानात्मक होतं. अनेक हिंदी चित्रपट यावर्षी बॉक्स ऑफिसवर (box office) आपली जादू दाखवू शकले नाहीत. त्यातून हे वर्ष बॉलिवूडच्या वादांगांनीच (bollywood controversy) अधिक भरले होते. लाल सिंग चड्ढाच्या (laal singh chaddha) बायाकोटपासून ते काश्मिर फाईल्स (kashmir file) आणि रणवीर सिंगचं (Ranveer singh nude photoshoot) न्यूड फोटोशूट या सर्व प्रकरणांमुळे बॉलिवूडमध्ये जोरदार हंगामा झालेला पाहायला मिळाला. (mns leader ameya khopar warns bollywood on taking pakistani celebratries in movies)
परंतु सध्या बॉलिवूडमध्ये अनेक पाकिस्तानी कलाकार (pakistani celebraties) पुन्हा दिसू लागले असून पाकिस्तानी कलाकार हिंदी चित्रपटांतून परत दिसले तर त्याचे गंभीर परिणाम संबंधित निर्मात्यांना भोगावे लागतील असा आक्रमक पवित्रा महाराष्ट्र नवनिर्माण सेने उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (amey khopkar) यांनी घेतला आहे.
नुकतेच अमेय खोपकर यांनी समाजमाध्यमांवरून (social media) निर्मात्यांना कडक इशारा दिला आहे. या स्टेटसमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, ''बॉलिवूडमधील काही निर्मात्यांना पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांचा पुळका आला आहे, असं कानावर येतंय. ही नीच प्रवृत्ती वेळोवेळी ठेचावीच लागते, म्हणूनच पुन्हा एकदा आम्ही स्पष्ट शब्दात इशारा देतोय की फक्त मुंबईच काय, हिंदूस्थानातील कोणत्याही भाषेतल्या कलाकृतीत पाकिस्तानी कलाकार दिसला तर त्याचे गंभीर परिणाम संबंधित निर्मात्यांना भोगावे लागतील.', असा कडक इशारा अमेय खोपकरांनी दिला आहे.
अमेय खोपकरांनी आज फेसबुकवर एक (fb post) पोस्ट शेअर केली आहे ज्यात त्यांनी याबाबतीत स्पष्टपणे इशारा दिला आहे. अमेय खोपकरांच्या या पोस्टला लोकांकडून चांगला प्रतिसाद येतो आहे. त्याचबरोबर अमेय खोपकरांनी अनेकांनी या मुद्द्यावरून पांठिबा दर्शवला आहे.
बॉलीवूडमध्ये फवाद खान, आतिफ असलम सारख्या पाकिस्तानी कलाकारांनी बॉलीवूडमध्येही लोकप्रियता मिळाली आहे. मध्यंतरी बॉलिवूडमध्ये 'ए दिल हैं मुश्किल' या चित्रपटात पाकिस्तानी कलाकार फवाद खाननं भुमिका केली होती. ज्यावरून वादंग उभा राहिला होता. बॉलिवूडमध्ये वाढत्या पाकिस्तानी कलाकरांचे प्रमाण पाहता मनसे (MNS) आक्रमक झाली आहे. सध्या ही पोस्ट सगळीकडे व्हायरल होत आहे.