Pune DJ News: आजकाल लोकांमध्ये सेलिब्रेशनच (celebration) प्रमाण वाढू लागलं आहे. मध्यंतरी असाच एक व्हिडीओ व्हायरल (video viral) झाला होता ज्यात एका शेतकऱ्याच्या मुलाला अग्निपथ योजनेत सैन्यभरती झाल्यानं, ही आनदांची बातमी साजरी करण्यासाठी त्यानं आणि त्याच्या गावकऱ्यांनी चक्क डीजे (DJ News) लावून संपुर्ण गावभर डान्स केला होता. त्यामुळे लग्नसराईचं नाही किंवा सणउत्सवही नसताना आजकाल डीजे कुठेही आणि कधीही वाजवले जातात आणि त्यावरून मग एकच हंगामा होतो. डीजे लावण्यावरून आणि नाही लावण्यावरून अनेकदा वाद होतात. त्यातून भांडणंही आणि मारामारीपर्यंतही प्रकरणं जातात. सध्या असाच एक प्रकार पुण्यात (pune news today) घडला आहे. या प्रकारानं सगळीकडेच चर्चांना उधाण आलं आहे. (a complaint filed against hotel manager for extending the dj time pune news marathi)
सध्या एका बारचालकाला डीजे लावून वेळेचं उल्लंघन करणं महागात पडलं आहे. डीजे वाजवल्याप्रकरणी कोरा कॉकटेल बारच्या मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घालून दिलेल्या नियमांचे आणि वेळेचे उल्लंघन करत मोठ्या आवाजात साऊंड सिस्टिम लावून, संगीत वाजवून उपद्रव केल्याप्रकरणी कोरेगाव पार्क येथील कोरा कॉकटेल बार अँड किचन हॉटेलचे मॅनेजर (hotel manager) आणि डीजेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने ही कारवाई केली. यावेळी हॉटेलमधील साऊंड सिस्टिम डीजे मिक्सर जप्त करण्यात आले आहेत. शहरात वेळेचे आणि घालून दिलेल्या मर्यादाचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल चालकांवर मागील काही दिवसांपासून गुन्हे शाखेकडून कारवाई केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर कोरा कॉकटेल बार अँड किचन हॉटेलवर ही कारवाई करण्यात आली आहे. 3 डिसेंबर रोजी हॉटेल चालक हॉटेल मॅनेजर आणि डीजे चालवणारे रात्री उशिरापर्यंत संगीत वाजवून उपद्रव करत असताना आढळून आले. त्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाने (police) ही कारवाई केली. गुन्हे शाखेचे पोलिसांबलदार राणे यांनी याप्रकरणी तक्रार दिली. त्यानुसार कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.