मनसेचा मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात जोरदार राडा

मनसेने (MNS) शिवसेनेच्या (Shiv Sena) कार्यक्रमात राडा (MNS Rada) केला.  

Updated: Jan 5, 2021, 09:42 PM IST
मनसेचा मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात जोरदार राडा   title=

वसई : मनसेने (MNS) शिवसेनेच्या (Shiv Sena) कार्यक्रमात राडा (MNS Rada) केला. वसई विरार (vasai-virar) महापालिका परिवहन सेवेच्या उदघाटन कार्यक्रमात गोंधळ झाला. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ( Minister Eknath Shinde) यांच्या हस्ते परिवहन सेवेचा लोकार्पण सोहळा होता. त्यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी हा गोंधळ घातला. ( MNS Rada in Minister Eknath Shinde's program at vasai-virar) महापालिका आयुक्त भेट नाकारत असल्याच्या कारणावरून, भर कार्यक्रमात आयुक्तांविरोधात मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेऊन कार्यक्रमातून बाहेर काढलं. त्यानंतर पोलीस स्टेशनलाही मनसे कार्यकर्त्यांना राडा केला. 
 
मनसे कार्यकर्ते आयुक्तांच्या भेटीची वेळ मागत होते. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने गोंधळ झाला. काही पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याने मनसे कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले. यावेळी मनसेकडून पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आला. पोलीस सरकारचे दलाल असल्या सारखे वागत आहेत. सत्ता येते जाते पण पोलिसांनी पोलिसांसारखे काम करावे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिंदाबाद घोषणा देणे चूक आहे का? सत्तेची दलाली आणि माज पोलिसांनी करू नये, असे मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. एवढाच माज असेल तर वर्दी दोन तास बाजुला ठेवून समोरासमोर भिडा आणि मग दाखवतो महाराष्ट्र सैनिक काय आहे, असा आक्रमक पणा घेत पोलिसांनाच इशारा दिला.

दरम्यान, आझाद मैदान इथे पोलिसांवर हल्ला झाला तेव्हा मनसेने पोलिसांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला, असेही संदीप देशपांडे यांनी म्हटले. ज्या पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांवर हात उचलला त्यांचे तात्काळ निलंबन व्हावे, अशी मागणी मनसेने केली आहे.