पिंपरी चिंचवड : पिंपळे गुरव (Pimpale Gurav) भागात दोन कुत्र्यांना पोत्यात घालून जाळल्याचा (Two dogs were burnt alive in a bag at Pimpri Chinchwad) आणि इतर चार कुत्र्यांवर विषप्रयोग केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी सांगवी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी दुपारी विनोद मुरार यांना अर्धवट जळलेल्या अवस्थेत ही कुत्री आढळली. त्यानंतर काल रात्री त्यांनी या प्रकरणी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला. शनिवारी रात्री त्यांच्याही कुत्र्याने खाल्ले होते. त्यामुळे त्याला प्रचंड त्रास झाला. आणि रविवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. स्वतःच्या कुत्र्याला ते जाळण्यासाठी गेले असता त्यांना दुसऱ्या कुत्र्याला पोत्यात जाळल्याचे लक्षात आले. त्याच परिसरात इतर चार कुत्र्यांचा ही मृत्यू झाल्याचे त्यांना समजले. त्यानंतर त्यांनी सांगावी पोलिस स्थानकात याबाबत तक्रार केली.
पिंपरी चिंचवडच्या (Pimpri Chinchwad) शिवतेजनगर नदीकाठी पोत्यामध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेत कुत्रे आढळून आले. याच भागात राहणाऱ्या विनोद मुरार यांनी ही घटना उघड केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा केला आहे. दोन कुत्र्यांच पोस्टमार्टेम त्यांचा व्हिसेरा राखून ठेवला आहे. विषप्रयोगाने कुत्री मरण पावली की बाहेर टाकलेले पदार्थ खाऊन त्यांना त्रास झाला याचा पोलीस शोध घेत आहेत. कुत्रा कुणी जाळला याचा पोलिस शोध घेत आहेत, अशी माहिती गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक अजय भोसले यांनी दिली.
या पूर्वीही पिंपळे गुरव परिसरात चौथ्या मजल्यावरून कुत्रा फेकून त्याची हत्या करण्यात आली होती. त्या प्रकरणी ही सांगवी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सातत्याने याच परिसरात घटना घडत असल्याने श्वान प्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे.