Monsoon 2022 Updates : असनी चक्रीवादळामुळे मान्सून लवकर येणार?

शेतकरी आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी सुखद बातमी

Updated: May 9, 2022, 10:03 AM IST
Monsoon 2022 Updates : असनी चक्रीवादळामुळे मान्सून लवकर येणार?  title=

मुंबई : बंगालच्या उपसागरातल्या असनी चक्रीवादळाने मान्सूनची वाट सोपी केली आहे. असनी चक्रीवादळ शमल्यावर कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल. त्यामुळे मान्सूनची वाटचाल वेगाने होईल असा अंदाज हवामान विभागाचा आहे. 

अंदमानात मान्सून 17 मेपर्यंत तर केरळात 28 मेपर्यंत पोहोचेल असं सांगण्यात आलं आहे. आज या चक्रीवादळाचं महाचक्रीवादळात रूपांतर होत आहे. त्यामुळे कोकणात बुधवारी आणि गुरूवारी तर मध्य महाराष्ट्रात गुरूवार आणि शुक्रवारी पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

या चक्रीवादळाचा थेट मान्सूनशी संबंध नाही. पण हे वादळ शमल्यावर कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार होईल. त्यामुळे मान्सूनचे वारे त्या दिशेने लवकर येतील.