Monsoon 2022 | राज्यात मान्सूनपूर्व पावसाचं थैमान, 12 जिल्ह्यांना अलर्ट

उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा पण फळबागांचं नुकसान, मान्सूनपूर्व पावसाचा पाहा तुमच्या जिल्ह्यातला अंदाज

Updated: May 28, 2022, 07:49 AM IST
Monsoon 2022 | राज्यात मान्सूनपूर्व पावसाचं थैमान, 12 जिल्ह्यांना अलर्ट title=

मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई पूर्वउपनगरात पावसाच्या सरी बरसल्या. उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. 

गेल्या पाच दिवसांपासून श्रीलंकेत मुक्काम ठोकलेल्या मान्सूनचा पुढचा प्रवास सुरू झाला आहे.  त्यामुळे येत्या 48 ते 72 तासांमध्ये मानसून केरळ मध्ये लावेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

दक्षिण अरबी समुद्र, मालदीव तसेच लक्षद्वीप बेटांच्या काही भागांत मान्सून दाखल झालेला आहे. मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी अनुकूल वातावरण तयार झाला असून पुढील दोन दिवसात तो केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. 

मान्सून 27 मे पर्यंत केरळात पोहोचेल अशी अपेक्षा होती. मात्र त्याचा वेग मंदावल्याने थोडी वाट पाहावी लागणार आहे. मात्र मान्सूनपूर्व पावसाचा हवामान विभागाने अलर्ट दिला आहे. 

रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रात 30 मे रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला. मान्सूनपूर्व पावसामुळे आंबा पिकाचं मोठं नुकसान झालं. 

परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला. 30 आणि 31 मे रोजी या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होईल असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.