गणपतीला कोकणात जाणा-यांसाठी एसटीच्या जादा 3100 बसेस ; लगेच तिकीट बुक करा

गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी गूज न्यूज आहे. प्रवाशांच्या सोईसाठी जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. 

Updated: Aug 14, 2023, 05:57 PM IST
गणपतीला कोकणात जाणा-यांसाठी एसटीच्या जादा 3100 बसेस ; लगेच तिकीट बुक करा title=

Ganpati Special ST Bus : गणपतीसाठी कोकणात जाणा-यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गणपतीला कोकणात जाणा-यांसाठी एसटीच्या जादा 3100 बसेस धावणार आहेत. या एसटींचं आरक्षण सुरू झाले आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत 1700 बसेस आरक्षित झाल्या आहेत. गट आरक्षणामध्ये 75 वर्षे वयाच्या वरच्या ज्येष्ठ नागरिकांना 100 टक्के, ज्येष्ठ नागरिकांना आणि महिलांना 50 टक्के तिकिट दरात सवलत दिली जात आहे. 14 सप्टेंबर पासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. 

1700 बसेसचे तिकीट बुक

19 सप्टेंबर 2023 रोजी गणरायाचे आगमन होत आहे.  बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा 14 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर दरम्यान 3100 जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी 1700 बसेसचे गट आरक्षण पुर्ण झाले आहे. 

असं करा तिकीट बुक

गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना, गणपती बाप्पा , कोकणचा चाकरमानी न एसटी यांचे एक अतुट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. यंदा सुमारे 3100 जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील. https://msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर बसचे तिकीट बुक करु शकता. तसेच या बसेसचे आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या Msrtc Mobile Reservation App ॲपव्दारे, तसेच खाजगी बुकींग एजंट व त्यांचे ॲपवर उपलब्ध होणार आहे.

प्रवाशांच्या सोईसाई विविध सुविधा

गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार आहेत.

एसटीच्या ताफ्यात लवकरच नवीकोरी रातराणी बस दाखल होणार

एसटीच्या ताफ्यात लवकरच नवीकोरी रातराणी बस दाखल होणार आहे. रातराणीमधून प्रवाशांना झोपून प्रवास करता येणार आहे. खासगी बसेसप्रमाणे 2+1 स्लीपर एसटी सेवा सामान्य प्रवाशांसाठी सुरु होणार असल्यामुळं खासगी बसमधील प्रवाशांप्रमाणे एसटी प्रवाशांनाही आराम मिळेल. एसटीच्या दापोडी कार्यशाळेत बांधणी झालेली नव्या चेसिसवरील पहिली रातराणीची पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात शनिवारी नोंदणी झाली. मुंबई-कोकणसह मुंबई-लातूर मार्गावर ही रातराणी चालवण्याचं प्रस्तावित आहे. सप्टेंबरअखेर एकूण 50 रातराणी प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचे एसटी महामंडळाचे नियोजन आहे.