एकाच गावातल्या पाचशेहून अधिक जणांना अतिसाराची लागण

साथरोग नियंत्रण पथक आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथकही कोळवणमध्ये दाखल 

Updated: Oct 20, 2018, 03:29 PM IST
एकाच गावातल्या पाचशेहून अधिक जणांना अतिसाराची लागण  title=

यवतमाळ : यवतमाळच्या आर्णी नगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या कोळवण गावात दूषित पाण्यामुळे अतिसाराने थैमान घातलंय. गावातल्या तब्बल पाचशेहून अधिक जणांना अतिसाराची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. साथरोग नियंत्रणात आणण्यासाठी ग्रामीण रुग्णालयासह यवतमाळमधील साथरोग नियंत्रण पथक आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथकही कोळवणमध्ये दाखल झालंय.

दूषित पाणी घरोघरी 

कोळवणमध्ये पाणीपुरवठ्याची पाइपलाइन गळती झाल्यानंतर सांडपाण्याच्या नाल्यातील दूषित पाणी घरोघरी पोहोचते.

हेच दूषित पाणी कोळवणमधील नागरिकांना प्यावं लागतंय. या सगळ्या प्रकाराकडे नगरपालिकेने दुर्लक्ष केले असून साथरोग नियंत्रणाच्या दृष्टीने आरोग्य विभाग सतर्क नव्हता असा आरोप ग्रामस्थांकडून होतोय.

अतिसाराचे रूग्ण वाढत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय.