सातारा : राज्यभरात पावसाने ओढ दिली असली तरी महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणात २७.३६ टिएमसी इतका मुबलक पाणीसाठा शिल्लक असल्याने दररोज १९४६ मेगावॅट वीज निर्मिती होत आहे. यामुळे मुंबईसह राज्याला दिलासा मिळणार आहे. कोयना व्यवस्थापनाच गेल्या वर्षाच्या नियोजनाच हे यश मानाव लागेल.
कोयना धरणाचे तांत्रिक वर्ष १ जूनपासून सुरु होते. मात्र गेल्या वर्षीचा पाणी साठा शिल्लक असल्याने सध्या धरणात २७.३६ इतका मुबलक पाणीसाठा आहे पावसाने जरी ओढ दिली तरी मुंबई सह महाराष्ट्राला वीजेचा तुटवडा होउ शकत नाही. याचबरोबर सिंचनासाठी देखील पाणी उपलब्द होउ शकते सध्या दररोज १९४६ मेगॅवॅट वीज निर्मिती होत असून ती राज्यभर वितरीत केली जाते .