लेकीला कुशीत घेवून आईचा मृत्यू... मन सुन्न करणारा अपघात; चौकोनी कुटूंबाची ताटातूट

लग्न सोहळ्यासाठी घराबाहेर पडलेल्या कुटुंबाचा भीषण अपघात झाला. या अपघात एका महिलेचा आणि तिच्या एका जुळ्या मुलीचा मृत्यू झाला आहे. तर, तिचा पती आणि दुसरी जुळी मुलगी बचावले आहेत.  

वनिता कांबळे | Updated: May 27, 2023, 08:42 PM IST
लेकीला कुशीत घेवून आईचा मृत्यू... मन सुन्न करणारा अपघात; चौकोनी कुटूंबाची ताटातूट title=

Wardha Accident : लेकीला कुशीत घेवून आईचा मृत्यू झाला आहे. वर्धा येथे झालेला अपघात मन सुन्न करणारा आहे. या अपघातात चौकोनी कुटूंबाची ताटातूट झाली आहे. पती पत्नी आपल्या जुळ्या मुलींना घेवून बाईकने प्रवास करत होते. या अपघात पत्नी आणि एका जुळ्या मुलीचा मृत्यू झाला आहे. या अपघातात या मायलेकीचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे (Wardha Accident). 

वर्धा येथील बाजारवाडा फाट्याजवळ हा भीषण अपघात झाला आहे. मृत महिला आणि तिचे पती आपल्या दोन लहान जुळ्या  मुलींना घेवून बाईकवरुन लग्न सोहळ्यासाठी निघाले होते.  निलीमा राजकुमार सयाम ( वय 27 वर्षे) असे मृत महिलेचे नाव आहे. निलीमा यांच्यासह त्यांची दीड वर्षाची मुलगी तनुष्का राजकुमार सयाम हिचा या अपघातात मृत्यू झाला आहे. तर, निलीमा यांचे पती राजकुमार नामदेव सयाम ( वय 27 वर्षे) आणि दीड वर्षीय दुसरी एक जुळी मुलगी ही किरकोळ जखमी झाली आहे. 

टँकरने चिरडले 

विरुळ येथील रहिवासी राजकुमार सयाम हे विरुळ येथून दुचाकीने पत्नी व दोन जुळ्या मुलीला घेऊन मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई येथे आयोजित लग्न सोहळयात जात होते. दरम्यान बाजारवाडा फाट्याजवळ त्यांच्या बाईकला टँकर चालकाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी राजकुमार यांचे बाईकवरील नियंत्रण सुटले. दरम्यान पत्नी निलिमा हिच्या साडीचा पदर बाईकच्या चेनमध्ये फसला. एक जुळी मुलगी त्याच्या कुशीत होती. या मुलीला घेवून त्या बाईकवरुन खाली पडल्या. भरधाव टँकरने त्यांना चिरडले. राजकुमार हे देखील जुळ्या मुलींपैकी एका मुलीला घेवून बाईकवरुन खाली पडले. मात्र, ते भरधाव टँकरच्या विरुद्ध दिशेला पडल्याने ते बचावले आहेत.  

गरम डांबर अंगावर पडल्याने कामगार गंभीर जखमी

महाडमध्ये डांबर मिक्सिंग प्लँटमध्ये अपघात झाला आहे.  डांबर प्लांट मध्ये झालेल्या अपघातात एक कामगार भाजून गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर महाडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आले आहे. डांबर वाहून नेणारा पाईप निघाल्याने गरम डांबर अंगावर सांडल्याने तो गंभीररित्या जखमी झाला आहे.