Dhule News : धुळे शहरातील महिंदळे शिवारात शिवारात विचित्र घटना घडली आहे. विजेच्या धक्क्याने सुनेसह सासूचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. पावसाच्या दिवसांत विजेच्या तारांपासून खबरदारी घेणे गरजेचे आहे. अन्यथा मोठ्या दुर्घटना घडू शकतात.
ओले कपडे घरातील तारेवर टाकत असतांना तारेत विद्युत प्रवाह असल्याने विजेचा धक्का लागून सुनेसह सासूचा जागीच मृत्यू झाला आहे. बजरंग सोसायटीत राहणाऱ्या शोभाबाई या घरातील ओले कपडे सुकविण्यासाठी तारेवर ताकत असताना
तारेत विद्युत प्रवाह असल्याने शोभाबाई यांना विजेचा धक्का लागला. यावेळी शोभाबाई ही तारेसह जवळच खाली बसलेल्या सासू रुखमाबाई यांच्या अंगावर पडल्या. त्यामुळे रुखमाबाई यांनाही विजेचा धक्का बसला. या घटनेत शोभाबाई कृष्णा झीने यांच्यासह सासू रुखमाबाई पांडुरंग झीने यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
भाईंदर पूर्वेच्या स्टेशनं परिसरातील नवकीर्ती प्रीमायसेस नावाच्या इमारतीचा सज्जा कोसळून दुर्घटना घडली. या घटनेची माहिती मीरा भाईंदर पालिकेच्या अग्निशमन पथकाच्या जवानांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी पोहचून धिगाऱ्याखाली अडकलेल्या तीन पादचाऱ्यांना बाहेर काढले. तर साचलेला मलबा काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असताना एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. दुर्गा अवधेश राम असं मृत्यू झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे.
दुचाकीवरून जाणाऱ्या एका तरुणीला एका व्हॅन चालकाने राँग साइडने बेदरकारपणे वाहन चालवत आणत थेट तिला समोरून धडक दिली. इतकेच नव्हे तर तिला फरफटत नेले. या दुर्घटनेत तरुणीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे. वैष्णवी धर्मे असं मृत तरुणीचे नाव आहे. वैष्णवी दुचाकीवरून जात असताना भारतनगर चौकात एम.एच.-31 ए.जी. 5117या व्हॅनच्या चालकाने राँग साइडने आणली. व्हॅनचा वेग इतका जास्त होता की त्याच्या चाकाखाली वैष्णवी 50 फुटांहून अधिक अंतरापर्यंत अक्षरश: फरफटत गेली. तिने हेल्मेट घातले असूनही तिच्या डोक्यासह यकृत व पोटाला मोठी दुखापत झाली. तिला घटनास्थळावरील लोकांनी तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान वैष्णवीचा मृत्यू झाला. 15 दिवसांपूर्वीच वैष्णवीने सीएची परीक्षा उत्तीर्ण केली होती.