मुंबई : आज जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे. सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योग दिनानिमित्त नागरिकांना शुभेच्छा देऊन संबोधित केल आहे. विदर्भातील अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांनी देखील 'करे योग, रहे निरोग' म्हणत योग दिवस साजरा केला. योगाचं महत्व सांगत मोकळ्या वातावरणात खासदार नवीनत राणा योग साधना करताना दिसल्या.
करो योग रहो निरोग।
Posted by Navneet Ravi Rana on Saturday, June 20, 2020
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज घरात राहूनच योह दिन साजरा केला जात आहे. योग दिनच्या निमित्ताने योग करायला सुरूवात करा आणि कोरोना व्हायरसपासून स्वतःला लांब ठेवा. योग हाच स्वस्थ आरोग्याचा पासवर्ड आहे. याच पार्श्वभूमीवर नवनीत राणा यांनी देखील योग साधना करून आपल्या दिवसाची सुरूवात केली.
करो योग रहो निरोग। pic.twitter.com/Sbl3LBvJZu
— Navneet Kaur Rana (@NavneetKRana) June 21, 2020
काही दिवसांपूर्वी खासदार नवनीत राणा यांनी अमरावती जिल्ह्यातील एका शेतात जाऊन शेतकऱ्यांना पेरणी करण्याच्या कामात मदत केली आहे. रस्ता ओलांडून शेत तूडवत बांधावर जात त्यांनी पेरणी करणाऱ्या बैल जोडीची आणि शेतकऱ्यांचे औक्षण करून थेट कासरा हातात घेत पेरणी केली.
एक सजग नागरिक के रूप में हम परिवार और समाज के रूप में एकजुट होकर आगे बढ़ेंगे।
हम प्रयास करेंगे कि Yoga at home and Yoga with family को अपने जीवन का हिस्सा बनाएँ।
हम ज़रूर सफल होंगे, हम ज़रूर विजयी होंगे: PM @narendramodi— PMO India (@PMOIndia) June 21, 2020
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आज पंतप्रधान मोदी यांना देशाला संबोधित केले. त्यांनी यावेळी सर्वांना योगदिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी म्हटलं की, 'आंतरराष्ट्रीय योग दिन हा एकतेचा दिवस आहे. जो विश्व बंधुत्वाचा संदेश देतो. यंदाचा योग दिवस कुटुंबातील बाँडिंग वाढवण्याचा योग आहे. आपली इम्युनिटी चांगली असेल तर आजारावर विजय मिळवू शकतो. प्राणायममुळे शरिराची स्ट्रेंथ वाढते. हे प्रभावी आहे. प्राणायमचे अनेक प्रकार आहेत. प्राणायमचा तुमच्या व्यायामात समावेश करा.'