मुंबई : Navneet Rana and Hanuman Chalisa controversy : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक झाली होती. त्या 14 दिवस जेलमध्ये होत्या. त्यांची सुटका झाल्यानंतर त्यांनी आज मीडियाशी संवाद साधला. मात्र, जामीनावर सुटका झालेल्या नवनीत यांना मीडियाशी बोलण्यास मनाई करण्यात आली होती. तरीही त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा शाधला. त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांनी चॅलेंज दिले. त्यामुळे त्यांनी न्यायालयाच्या अटी आणि शर्तीचे उल्लंघन केलं का, याची चर्चा होऊ लागली आहे.
दरम्यान, खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी आज मीडियाशी साधलेला संवादाची माहिती आम्ही घेणार आहोत. राणा दाम्पत्य यांना जामीन देताना मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या अटी आणि शर्तीचा जर उल्लंघन होत असेल तर आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाईसाठी पुढाकार घेणार आहोत, अशी माहिती विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली.
मीडिया सोबत राणा दाम्पत्य यांनी साधलेल्या संवादची माहिती घेतल्यानंतर आवश्यक वाटल्यास आम्ही जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात तक्रार अर्ज करु असे विशेष सरकारी वकील प्रदीप घरत म्हणाले. आज नवनीत राणा यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मीडियाशी संवाद साधला. मात्र मुंबई सत्र न्यायालयाने जामीन देताना राणा दाम्पत्य यांना मीडियाशी बोलण्यावर प्रतिबंध लावले आहेत. तरीह त्यांनी राज्य सरकावर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यामुळे त्यांनी न्यायालयाच्या अटींचा भंग केल्याची चर्चा आहे.