ठाकरे गटाचे खासदार आणि भाजपचे आमदार दोघांमध्ये बाचाबाची; एकमेकांची औकात काढली

धाराशिवमध्ये पीक विम्यावरून आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यात चांगलीच जुंपली. जिल्हाधिका-यांच्या समोरच या दोघा लोकप्रतिनिधींमध्ये शाब्दिक चकमक उडाली, त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. 

Updated: Dec 3, 2022, 08:06 PM IST
ठाकरे गटाचे खासदार आणि भाजपचे आमदार दोघांमध्ये बाचाबाची; एकमेकांची औकात काढली title=

Maharashtra Politics : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले आहे. मात्र, शिंदे गट आणि भाजपमध्ये मतभेद असल्याचे दिसत. दोघांमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे (Shiv Sena Uddhav Thackeray) खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje nimbalkar) आणि भाजपचे आमदार राणा जगजितसिंह (BJP MLA Ranajagjitsinha Patil) यांच्यात बाचाबाची झाली आहे. यांच्यात शाब्दिक वाद सुरु असताना दोघांनी  एकमेकांची औकात काढली.

धाराशिवमध्ये पीक विम्यावरून आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यात चांगलीच जुंपली. जिल्हाधिका-यांच्या समोरच या दोघा लोकप्रतिनिधींमध्ये शाब्दिक चकमक उडाली, त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. 

विमा कंपन्यांकडून शेतक-यांना तुटपुंजा विमा मिळत असल्यानं खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली होती. त्यामुळं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर संतप्त शेतक-यांनी गर्दी केली.

दरम्यान, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन बैठकीचं निमंत्रण लोकप्रतिनिधींना का दिलं नाही, असा जाब विचारला... त्यावरून वाद झाला. बैठकीत चर्चा सुरु असताना राणाजगजीतसिंह पाटील यांनी ओमराजेंना 'बाळ' असं म्हणाले. या वक्तव्यामुळे खासदार ओमराजे निंबाळकर भडकले. 'मला बाळ म्हणू नको,  तू तूझ्या औकातीत राहा, तुमचे संस्कार, तुमची औकात मला सगळं माहित आहे, जास्त बोलू नकोस असं  ओमराजे निंबाळकर म्हणाले. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत दोघंना शांत केले आणि वादावर पडदा टाकला.