close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

खासदार सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांवर दडपशाहीचा आरोप

सुप्रिया सुळेंची चौकशीची मागणी....

Updated: Sep 15, 2019, 04:51 PM IST
खासदार सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांवर दडपशाहीचा आरोप

बारामती : बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दडपशाहीचा आरोप केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या वेळी बारामतीत कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्यामुळं पोलिसांनी लाठीमार केला. ही दडपशाही थांबायला हवी आणि त्याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

भाजपच्या महाजनादेश यात्रेदरम्यान बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच जोरदार घोषणाबाजी केली. सभा संपताच एकच वादा अजितदादा अशा जोरदार घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. यामुळे काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांच्यावर पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला.