नाशिक : राज्यभरात एमपीएससीच्या विद्यार्थ्याचे आज प्रशासनाविरोधात आंदोलन सुरू झाली आहे. आज बी. डी. भालेकर मैदानावर सकाळी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
यावेळी कोणत्याही घोषणेशिवाय प्रशासनाचा निषेध करण्यात आलाय. सर्व स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले असून भावी करिअरसाठी आणि घोटाळे टाळण्यासाठी हे आंदोलन करण्यात येतंय.
2009 ते 2017 दरम्यान डमी विद्यार्थ्याचे रॅकेट बाबत चौकशी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची चौकशी, परीक्षा केंद्रावर बायोमेट्रिक हजेरी, मोबाईल जमर्ससह परीक्षा पद्धतीत पारदर्शक कारभाराची विद्यार्थ्याची मागणी करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे विद्यार्थी कोणत्याही प्रकारच्या घोषणा न देता या कारभाराचा निषेध केलाय. झी 24 तासनं या घोटाळ्यात अडकलेल्यांचा परदाफाश करून परीक्षांचं वास्तव विद्यर्थयाच मदतीने समोर आणेल होतं.