राज्यातील जनतेला महावितरणाचा मोठा शॉक, गुपचूप विजेच्या दरात वाढ

MSEDCL Secretly Increased In Electricity Bill Tariff : राज्यातील जनतेला महावितरणाचा मोठा शॉक दिला आहे. महावितरणने गुपचूपपणे विजेच्या दरात वाढ केली आहे.  

Updated: Jun 14, 2022, 12:40 PM IST
राज्यातील जनतेला महावितरणाचा मोठा शॉक, गुपचूप विजेच्या दरात वाढ title=

मुंबई : MSEDCL Secretly Increased In Electricity Bill Tariff : राज्यातील जनतेला महावितरणाचा मोठा शॉक दिला आहे. महावितरणने गुपचूपपणे विजेच्या दरात वाढ केली आहे. यासाठी इंधन समायोजन शुल्काचा आसरा घेतला आहे. वीज प्रति युनिट 5 पैसे ते 25 पैशांपर्यंत महाग झाली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाने 30 मार्च 2020 ला दिलेल्या आपल्या आदेशात हे शुल्क शून्य केले होते. 

कोळसा संकटामुळे राज्यात भीषण विजेचे संकट निर्माण झाले होते. लोडशेडिंग टाळण्यासाठी महागड्या दरावर वीज खरेदी करावी लागली. त्यामुळे अतिरिक्त खर्चाची भरपाई करण्यासाठी एफएसी वसूल करण्याची विनंती करण्यात आली होती. 

आयोगाने महावितरणला तीन महिन्यांपर्यंत वसुली करण्यास मंजुरी दिली आहे. याअंतर्गत श्रेणीनिहाय 5 पैसे ते 25 पैशांपर्यंत इंधन समायोजन शुल्क वसूल करणे सुरु झाले आहे. विशेष म्हणजे महावितरणने नागरिकांना कुठलीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.