लग्नाला नकार, त्याने मुलीच्या आई-बापाला जिवंत जाळले, मुंबईतील त्या घटनेत 22 वर्षानंतर न्याय

Mumbai Crime News: एकतर्फी प्रेमातून त्याने तरुणीच्या आई-वडिलांना जिवंत जाळले. 22 वर्ष शोध घेतल्यानंतर अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला. मुंबईतील घटना 

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 26, 2023, 10:59 AM IST
लग्नाला नकार, त्याने मुलीच्या आई-बापाला जिवंत जाळले, मुंबईतील त्या घटनेत 22 वर्षानंतर न्याय title=
mumbai crime branch arrest man from maharashtra after 22 years from pune who burnt alive couple

Mumbai Crime News: 22 वर्षांपूर्वी मुंबईत घडलेल्या हत्याकांडाने सगळ्यांनाच हादरवून सोडले. एका चहाच्या दुकानात जोडप्याला जिवंत जाळण्यात आले. या प्रकरणात आता अखेर 22 वर्षांनी न्याय झाला आहे. 2001मध्ये कांदिवलीतील एका हॉटेलमध्ये झालेल्या अग्नीकांडात 48 वर्षांचे जहराबी आणि तिचे पती अब्दुल रहमान यांचा जळून मृत्यू झाला होता. या घटनेतील फरार आरोपी असलेल्या यशवंत बाबूराव शिंदे  याला 22 वर्षांनी अटक करण्यात दहिसर क्राइम ब्रँचला यश आले आहे. यापूर्वी पोलिसांनी आरोपी शिंदेंचे सहकारी मोहिद्दीन शेख, नागनाथ तेलंगे आणि व्यंकट पाचवाड या आरोपींना अटक केली होती. मात्र मुख्य आरोपी यशवंत शिंदेंला मात्र शोधू शकले नव्हते मात्र आता पोलिसांना यश आलं आहे. 

डीसीपी राजतिलक रौशन यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक सुधीर दळवी आणि विजय रासकर, दिलीप तेजनकर व नवनाथ जगताप यांच्या पथकाने ही केस पुन्हा रिओपन करुन गेल्या काही दिवसांपासून आरोपीच्या लातूर गावात शोधमोहिम आखली होती. तिथेच त्यांना आरोपी गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील कोंढवामध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून शुक्रवारी आरोपीला अटक केली आहे. 

एकतर्फी प्रेम 

यशवंत पेटिंगचे काम करायचा. मुंबईत काम मिळेल आणि पैसेही जास्त मिळतील यासाठी तो त्याच्या साथीदारांसह मुंबईत आला. इथे त्याचे जहराबी आणि अब्दुलच्या मुलीवर प्रेम जमले तिच्यासोबत त्याला लग्न करायचे होते. मात्र, तिच्या आई-वडिलांनी नकार दिला. त्यांनी एक दोन वेळा यशवंतला मारहाणदेखील केली. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली. इतकंच नव्हे तर त्यांनी त्यांच्या मुलीचं लग्न दुसरीकडे ठरवले. त्यामुळं यशवंत संतापला आणि रागाच्या भरात मुलीच्या आई-वडिलांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. 

मुलगी घरात तिच्या भावांसोबत झोपलेली असताना तिचे आईवडिल त्यांच्या चहाच्या दुकानात गेले होते. ते दोघेही तिथेच झोपत अशत. त्याचवेळी 12 ऑगस्ट 2001 मध्ये आरोपीने हॉटेलला आग लावली. त्याचवेळी आत झोपलेले जहराबी आणि अब्दुल दोघांचा मृ्त्यू झाला. त्यावेळी पोलिसांनी या केसमधील तीन आरोपींना अटक केली. त्यावेळी त्यांच्या चौकशीतून यशवंत शिंदेचे नाव समोर आले. त्यानंतप पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथके रवाना केली. मात्र त्याचा काहीच तपास लागला आहे. 

मुलीच्या आई-वडिलांची हत्या केल्यानंतर आरोपी बेंगळुरुला पळून गेला. त्यानंतर तो पुण्यात राहू लागला. इतकंच नव्हे तर 2005 मध्ये त्यांने लग्नही केले. मात्र त्याची खबर त्याच्या आई-वडिलांनाही लागू दिली नाही. मात्र, इतक्या प्रयत्नानंतरही 22 वर्षांनंतर त्याला अटक करण्यात यश आलं आहे.