नवरा-बायकोच्या भांडणात सासूचा हकनाक बळी; विरारमध्ये जावयाने मुलांसमोरच केले आमानुष कृत्य

Virar Murder Case: विरार येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. बायकोसोबतच्या भांडणातून जावयाने सासूची हत्या केली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 20, 2024, 08:00 AM IST
नवरा-बायकोच्या भांडणात सासूचा हकनाक बळी; विरारमध्ये जावयाने मुलांसमोरच केले आमानुष कृत्य  title=
mumbai news man killed his mother in law due to dispute with wife in virar

Virar Murder Case: विरार येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून जावयाने सासूची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. काहि दिवसांपूर्वी वसईत प्रियकराने प्रेयसीची भररस्त्यात हत्या केल्याची घटना घटना होती. त्यानंतर असाच हत्येचा थरार समोर आला आहे. विरारच्या साईनगर येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. लक्ष्मी हरी कांबे,वय-६० असं मयत सासू चं नाव असून प्रंशात खैरे ,४० असं आरोपी जावयाचे नाव आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीचे पत्नीसोबत गेल्या कित्येत महिन्यांपासून कौटुंबिक वाद सुरू होते. त्यामुळं पती तिच्या मुलांसोबत विरार येथे तिच्या माहेरी राहत होती. याचाच राग आरोपीच्या मनात होता. बुधवारी आरोपीचे पत्नीसोबत भररस्त्यात जोरदार भांडण झाले होते. त्यानंतर पत्नी कामावर गेल्यानंतर आरोपीने साईनाथ नगर येथील सासूच्या घरी जाऊन तिच्याशी वाद घातला. सासूसोबतचा वाद इतका विकोपाला गेला की आरोपीने संतापाच्या भरात तिची हत्या केली. 

सासूसोबत झालेल्या वादात आरोपीने संतापाच्या भरात लहान मुलांसमोर किचन मधील चाकू च्या सहाय्याने सासूवर वार करत तिची हत्या केली. हत्येनंतरही आरोपी तिच्या मृतदेहाशेजारी बसून राहिला होता. आजूबाजूच्या नागरिकांनी या घटनेची माहिती विरार पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ पोहोचून आरोपीला अटक केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसंच, आरोपीने मुलांसमोरच सासूवर वार केल्याने त्यांनाही मोठा मानसिक धक्का बसला आहे. 

वसई हत्याकांडामुळंही खळबळ 

वसईत प्रियकराने प्रेयसीच्या डोक्यात वार करुन तिची निर्घृण हत्या केली आहे. वसई पूर्व चिंचपाडा परिसरात ही घटना घडली आहे. लोखंडी पाना डोक्यात मारून ही हत्या केली आहे. हत्या करताना बघ्याची गर्दी ही मोठ्याप्रमाणात होती पण कोणीही तिला सोडविले नसल्याचे व्हिडीओ मधून दिसत आहे. रोहित यादव असं आरोपीचे नाव आहे. या घटनेने परिसरातून एकच संताप व्यक्त करण्यात येत आहे. आरोपी व मयत तरुणी दोघेही वसईच्या खासगी कंपनीत कामाला होते. या दोघांमध्ये प्रेम संबंध होते, मात्र तरुणीचे दुसऱ्यासोबत प्रेम संबंध असल्याच्या वादातून रोहित व तरुणीमध्ये काही दिवसांपासून भांडणे सूरू होती, याच भांडणाचा शेवट करताना रोहित लोखंडी पाना तरुणीच्या डोक्यात घालून तिची हत्या केली.