फास्ट ट्रॅक नाही फिश ट्रॅक... मुंबई लोकलच्या ट्रॅकवर माशांचं आऊटींग! अविश्वनीय Video पाहाच

Fish Swimming On Local Train Tracks: हा व्हिडीओ मुंबईमधील असल्याचं व्हिडीओमध्ये ऐकू येत असलेल्या मराठीमधील संवादावरुन स्पष्ट होत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 10, 2024, 02:49 PM IST
फास्ट ट्रॅक नाही फिश ट्रॅक... मुंबई लोकलच्या ट्रॅकवर माशांचं आऊटींग! अविश्वनीय Video पाहाच title=
हा व्हिडीओ सध्या होतोय व्हायरल

Fish Swimming On Local Train Tracks: केवळ महाराष्ट्रातच नाही तर मागील काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक राज्यांना धुवाँधार पावसाने झोडपलं आहे. महाराष्ट्राबरोबरच उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारसहीत अनेक राज्यांमधील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अनेक राज्यांमधील नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. बिहारसारख्या राज्यामध्ये तर नदीवरील पूल पडण्याच्या एकामागून एक अनेक घटना घडल्यात. काही ठिकाणी कंबरभर पाण्यातून वाहनांना मार्ग काढावा लागथ आहे. मात्र नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये रेल्वे ट्रॅकवर चक्क मासे पोहताना दिसत आहेत. 

ट्रॅकमध्ये पोहणारे मासे

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडीओमध्ये दोन रुळांदरम्यान साचलेल्या पाण्यामध्ये काही सापासारखे दिसणारे लांबलचक मोठ्या आकाराचे मासे पोहत असल्याचं दिसत आहे. आता हा व्हिडीओ काहीजण कल्याणचा म्हणत आहेत तर काहीजण डोंबिवलीचा म्हणत आहेत. पण हा व्हिडीओ नेमका कुठला हे ठामपणे सांगता येत नसलं तरी हा व्हिडीओ व्हायरल झालाय हे मात्र खरं. 

महिला प्रवाशांच्या गप्पा

हा व्हिडीओ काही महिला प्रवाशांनी शूट केल्याच्या व्हिडीओमधील आवाजावरुन स्पष्ट होत आहे. एक महिला दुसरीला व्हिडीओ काढ असा सल्ला देत असतानाच दुसरी व्हिडीओच काढतेय असं सांगताना ऐकू येतं. त्यानंतर या महिला हे मासे नदीच्या पाण्यातून आले असतील. त्यांना कळत नाहीये ते कुठे आहेत. ट्रॅकवर हरवलेत. कसे सुस्तावले बघ, अशी वाक्य या महिलांच्या संवादामध्ये ऐकू येत आहेत. हा व्हिडीओ 8 जुलै रोजीचा म्हणजेच सोमवारचा आहे. याच दिवशी मुंबई आणि उपनगरांमध्ये जोरदार पाऊस झाला होता. ज्यामुळे अनेक ठिकाणी ट्रॅकवर पाणी साचल्याने रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. तुम्हीच पाहा व्हायरल झालेले हे व्हिडीओ...

1)

2)

3)

4)

आता हे मासे ट्रॅकवर कसे आणि कुठून आले यासंदर्भातील वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत. दरम्यान, हे मासे चिवण्या नावाने ओळखले जाणारे मासे असल्याचं सांगितलं जात आहे. याच माशांना 'चढणीचे मासे' किंवा 'उद्धवनीचे मासे' असंही म्हणतात.