Twin Sisters Marriage : गेल्या तीन दिवसांमागे एका तरूणासोबत दोन मुलींनी मोठ्या थाटामाटात विवाह केला होता. सोलापूरमधील (Solapur) अकलूज (Akluj) येथे हा विवाह सोहळा पार पडला होता. जुळ्या बहिणींनी एकाच तरूणासोबत लग्न केल्याने हा विवाहसोहळा राज्यभरात चर्चेचा विषय बनला होता. सोलापूरच्या या तरूणाला लग्न केल्यापासून अडचणींना सामना करावा लागत असल्याचं दिसत आहे. महिला आयोगाने (Commission for Women) पोलिसांना पत्र पाठवत चौकशी करावी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. दोन मुलींसोबत विवाह केल्यामुळे मुलावर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. अशातच अतुलबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे.
अतुल आवताडे (Atul Avtade) असं वर मुलाचं नाव असून त्याने रिंकी आणि पिंकी या मुलींसोबत लग्न केलं होतं. प्रेमाच्या त्रिकोणाचा आता चौकोन होणार असल्याचं दिसत आहे. कारण अतुलच्या पहिल्या बायकोने त्याच्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी चौकशी केल्यावर अतुलचं पहिलं लग्न झाल्याची माहिती समोर आली आहे.
अतुलबाबत ही माहिती समोर आल्यावर मुलीच्या कुटुंबियाना धक्का बसला आहे. कारण तालुक्यात नाहीतर देशात चर्चेचा विषय ठरलेल्या या विवाहाबाबत ही माहिती समोर आल्याने याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
मुंबईच्या सांताक्रूझ परिसरात राहणाऱ्या पिंकी आणि रिंकी (Rinky Pinky Atul marriage) या तरुणी 2 डिसेंबर रोजी अकलूज जवळील गलांडे हॉटेलमध्ये अतुलसोबत लग्नबंधनात अडकल्या होत्या. दोघी एकमेकीपासून वेगळं राहू शकत नसल्यामुळे त्यांनी एकाच मुलासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. दोन्ही परिवारांच्या संमतीने हा विवाह सोहळा पार पडला होता.