ठाणे रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार; प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचे महत्त्वाचे निर्णय

Thane Railway Station News: ठाणे रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार आहे. प्रशासनाकडून विविध प्रकल्प आखण्यात येत आहेत. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 10, 2024, 02:13 PM IST
ठाणे रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार; प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचे महत्त्वाचे निर्णय  title=
municipal corporation will approve works on Thane Railway Station

Thane Railway Station: ठाणे रेल्वे स्थानकात नेहमीच गर्दी असते. गर्दीच्या वेळेत लोकल पकडणेही खूप अवघड होते. कधीकधी प्रवाशांना लोकलमध्ये चढायलाही मिळत नाही. ठाणे स्थानकात होणाऱ्या गर्दीवर तोडगा काढण्यासाठी ठाणे महानगरपालिका प्रयत्नशील आहे. मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिलेल्या आश्वासनानुसार, लवकरच स्टेशनच्या अधुनिकीकरणासंबंधीत कामांना मनता लवकरच मंजुरी देणार आहे. त्यांनी प्रशासनाला बैठका घेण्याचा आदेश दिला आहे. रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बांगर यांची बैठक झाली त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले आहे. 

ठाणेकरांना प्रवास करणे सोप्पे व्हावे आणि स्टेशन परिसरात होणारी गर्दी नियंत्रीत करण्यासाठी रेल्वे प्रशासन ठाणे रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण करत आहेत. यासाठी मनपाला अग्निशमन, गार्डन, सीवरेज आणि शहर विकास निगमची मंजुरी आवश्यक आहे. बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रस्तावित कार्याची अंतिम योजना तयार करण्यासाठी संबंधित विभागाची मंजुरी आवश्यक आहे. याबाबत जर काही अडचणी आल्या तर रेल्वे प्रशासन लवकरच याबाबत योजना आखून आमच्याशी चर्चा करेल, असं आयुक्तांनी म्हटलं आहे. 

ठाणे पूर्वेकडे सॅटिस पुलाचे काम सुरू आहे. आयुक्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या 8 ते 10 महिन्यात या पुलाचे काम पूर्ण होणार आहे. पुल आणि बस टर्मिनलचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पूर्वेकडील वाहतुक सुरळीत होणार आहे. स्टेशनच्या आधुनिकीकरणासाठी पुनर्विकास कामांची माहिती बैठकीत देण्यात आली आहे. 

बैठकीत अॅडिशनल कमिन्शर संदीप मालवी, प्रशांत रोडे, ट्रॅफिक डीसीपी डॉ. विनय कुमार राठोड, रेल्वे उप महाप्रबंधक संजीव जया, रेल्वे भूमि विकास प्राधिकरणच्या रमेश खोत, डीएमसी शंकर पटोले, परियोजना अधिकारी प्रवीण पापलकर, कार्यकारी अभियंता सुधीर गायकवाड हे उपस्थित होते. 

स्थानकांवर कोणती कामे करण्यात येणार

- ठाणे स्थानकातील 11 प्लॅटफॉर्मवर पूर्व-पश्चिम कनेक्टिंग डेक बनवण्यात येणार आहे. 

- डेक ठाणे पश्चिम आणि पूर्वकडेली सॅटिस प्रकल्पाला जोडण्यात येईल

- यामुळं गर्दी कमी होईल आणि प्रवाशांचा प्रवास सुरक्षितही होणार आहे. 

- डेकवर वेटिंग एरिया, तिकिट ऑफीस, टॉयलेट इत्यादी सारख्या सुविधा असतील. 

- रेल्वेच्या क्षेत्रात येणाऱ्या आउटर लेटरल जागेत बहुमजली पार्किंग असणार आहे. 

- तीन-चार व्यवसायिक इमारतींचा निर्माण रेल्वे करणार आहे.