पुणे : Murder attack on former sarpanch by current sarpanch in Pune : वेगरेचे माजी सरपंच भाऊ मरगळे यांच्यावर विद्यमान सरपंचांकडून खूनी हल्ला करण्यात आला. वेगरे येथील जि. प.शाळेत ग्रामसभा चालू असताना मागील ग्रामसभेचे वृत्त, प्रोसिडींग आणि घरकुल यादी बाबत विचारणा केली असल्याच्या कारणावरुन विद्यमान सरपंच मीनाथ कानगुडे आणि त्यांच्या तीन-चार साथीदारांनी माजी सरपंच भाऊ पांडुरंग मरगळे यांच्यावर खुनी हल्ला केला.
वेगरे येथे ग्रामसभेदरम्यान दररम्यान ही घटना घडली असल्याची माहिती पौड पोलिसांनी दिली. याबाबत फिर्यादी भाऊ मरगळे याने पौड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर यातील मुख्य सूत्रधार मिनाथ मारूती कानगुडे (37) आणि अभिषेक दत्तात्रय कानगुडे (21, दोन्ही रा. वेगरे तालुका मुळशी जिल्हा पुणे) यांना पौड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अन्य साथीदार फरारी आहेत.
ग्रामसभेदरम्यान सरपंचांना प्रोसेडिंग बुक आणि घरकुल यादीबाबत विचारणा केल्याचा राग मनात धरुन आरोपींनी पूर्व नियोजनातून फिर्यादीवर काठ्या आणि शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. यात भाऊ मरगळे गंभीर जखमी झाले. जखमीवर पिरंगुट येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भाऊ मरगळे यांच्या चारचाकी गाडीचीही नासधूस आरोपींनी केली आहे.