ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय गोलंदाज करणार कमाल, अश्विन मोडणार कपिलचा रेकॉर्ड तर बुमराहही रचणार इतिहास

Border Gavaskar Trophy :  टीम इंडियातील जवळपास सर्वच खेळाडू ऑस्ट्रेलियाला पोहोचले असून सध्या ते WACA मध्ये वॉर्म अप सामना खेळत आहेत, ऑस्ट्रेलिया दौऱ्या दरम्यान टीम इंडियाच्या अनेक क्रिकेटर्सकडे रेकॉर्ड नावावर करण्याची संधी आहे. 

पुजा पवार | Updated: Nov 15, 2024, 06:06 PM IST
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय गोलंदाज करणार कमाल, अश्विन मोडणार कपिलचा रेकॉर्ड तर बुमराहही रचणार इतिहास  title=
(Photo Credit : Social Media)

Border Gavaskar Trophy : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये (Border Gavaskar Trophy)  5 सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवण्यात येणार आहे. 22 नोव्हेंबर पासून या सीरिजला सुरुवात होणार आहे यांच्यातील पहिला सामना हा पर्थ स्टेडियमवर होईल. टीम इंडियातील जवळपास सर्वच खेळाडू ऑस्ट्रेलियाला पोहोचले असून सध्या ते WACA मध्ये वॉर्म अप सामना खेळत आहेत, ऑस्ट्रेलिया दौऱ्या दरम्यान टीम इंडियाच्या अनेक क्रिकेटर्सकडे रेकॉर्ड नावावर करण्याची संधी आहे. 

आर अश्विन मोडू शकतो कपिल देवचा रेकॉर्ड : 

ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्यांच्याच मैदानात भारताकडून खेळताना सर्वाधिक विकेट घेण्याचा रेकॉर्ड हा भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या नावावर आहे. कपिल देव यांनी ऑस्ट्रेलियामध्ये 11 टेस्ट सामने खेळले ज्यापैकी 24.58 च्या सरासरीने त्यांनी 51 विकेट्स घेतले. त्यांचा स्ट्राईक रेट 61.5 इतका होता. तर अनिल कुंबळे यांनी सुद्धा ऑस्ट्रेलियात 10 टेस्ट सामने खेळले असून त्यांनी या सामन्यात 49 विकेट घेतल्या आहेत. रविचंद्रन अश्विन ऑस्ट्रेलियामध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसरा भारतीय गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत 10 टेस्ट सामन्यात एकूण 39 विकेट घेतले. या सामन्यांमध्ये त्याचा अश्विनने 42.15 च्या सरासरीने विकेट्स घेतले तर यात त्याचा स्ट्राईक रेट हा 86.20 एवढा होता. जो कपिल देव आणि अनिल कुंबळेच्या मानाने खूप जास्त आहे. तेव्हा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 5 सामन्यांमध्ये आर अश्विन कपिल देव आणि अनिल कुंबळे यांचा रेकॉर्ड मॉडेल अशी अपेक्षा आहे. 

बुमराह पाचव्या क्रमांकावर : 

जसप्रीत बुमराह हा ऑस्ट्रेलियात सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत पाचव्या स्थानावर आहे. जर बुमराहने त्याचा फॉर्म कायम ठेऊन त्याच लयीत गोलंदाजी केली तर तो ऑस्ट्रेलियात त्याच्या 50 विकेट्सही पूर्ण करू शकतो. बुमराहने ऑस्ट्रेलियातील प्रत्येक सामन्यात सरासरी 5 पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. ही सरासरी कायम राहिल्यास तो 25 पेक्षा जास्त विकेट घेऊ शकतो. मात्र ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतीय गोलंदाजांनी विकेट्स घेऊन जरी योगदान दिलं तरी टीम इंडियाच्या फलंदाजांना देखील फटकेबाजी करून तेवढीच जबरदस्त कामगिरी करावी लागेल. तेव्हाच ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिरीज जिंकणं भारतासाठी शक्य होईल. 

हेही वाचा : टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या मॅचपूर्वी स्टार फलंदाजाला दुखापत

 

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघ : 

रोहित शर्मा (कर्णधार ), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाशदीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंगटन सुंदर.

टीम इंडियाचं WTC फायनलमध्ये पोहोचणं कठीण?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल 2025 मध्ये होणार असून त्याकरता क्वालिफाय होण्यासाठी टीम इंडियाला 6 पैकी 4 सामने जिंकणं महत्वाचं होतं. यात न्यूझीलंड विरुद्ध एक आणि नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात होणाऱ्या 5 सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा समावेश होता. मात्र न्यूझीलंड विरुद्ध तिसरा टेस्ट सामना गमावल्यावर भारताला आता WTC फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 पैकी 4 सामने जिंकावे लागणार आहे. परंतु ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजय मिळवण भारतासाठी तेवढं सोपं नसेल. आतापर्यंत बांगलादेश, इंग्लंड, न्यूझीलंड इत्यादीं विरुद्ध झालेलया टेस्ट सीरिज या भारतात खेळल्या गेल्या. मात्र बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारताला ऑस्ट्रेलियाचा दौरा करावा लागणार आहे. विदेशात टेस्ट सीरिज जिंकण्याचा टीम इंडियाचा इतिहास फार चांगला नाही. त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 सामन्यांची टेस्ट सीरिज जिंकण्यासाठी भारताची कसोटी लागणार आहे.