close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

जादूटोण्याच्या संशयात टोळक्याकडून दाम्पत्याची निर्घृण हत्या

मुलावर पोलिसांचा संशय

Updated: Nov 9, 2018, 11:33 AM IST
जादूटोण्याच्या संशयात टोळक्याकडून दाम्पत्याची निर्घृण हत्या

पुणे : जादूटोणा करता असं म्हणत एका टोळक्यानं दाम्पत्याची निघृणपणे हत्या केलीय. पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्याच्या औंढे गावात ही घटना घडलीय. नवसू वाघमारे (५५ वर्ष) आणि लिलाबाई मुकणे (५० वर्ष) असं हत्या झालेल्या दाम्पत्याची नावं आहेत. 

धक्कादायक बाब म्हणजे लिलाबाई यांच्या मुलानेच आपली आई आणि सावत्र वडील यांची हत्या केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

नवसू वाघमारे यांची पहिली पत्नी त्यांना सोडून गेली होती आणि लिलाबाई यांचे पतीदेखील त्यांना नीट वागवत नव्हते. त्यामुळे नवसू आणि लिलाबाईंनी लग्न केलं होतं.

गुरुवारी ते घरात जेवण करत असताना सात ते आठ जणांचं टोळकं घरात घुसलं आणि तुम्ही जादूटोणा करता म्हणून त्याच्यावर धारदार शस्त्रास्त्रानं वार केले.

या प्रकरणी खेड पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा तपास खेड पोलीस करत आहेत.