...जेव्हा एटीएममधून जळालेल्या नोटा बाहेर आल्या!

अकाऊंटमधून पैसे तर निघाले. पण जळलेल्या अवस्थेत... 

Updated: Nov 9, 2018, 01:53 PM IST
...जेव्हा एटीएममधून जळालेल्या नोटा बाहेर आल्या!

हेमंत चापुडे, झी मीडिया, मंचर - पुणे : देशभरात दिवाळीचा उत्सव सुरू आहे. त्यामुळे बँकांना सुट्टी आहे. पैसे काढण्यासाठी सर्व भार एटीएमवर पडत आहे. मात्र पुणे जिल्ह्यात मंचरमध्ये विचित्र प्रकार उघड झालाय. अॅक्सिस बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यास दोन हजाराच्या जळलेल्या अवस्थेतल्या नोटा बाहेर येत होत्या.

नोटा जळक्या स्वरूपात बाहेर आल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं. अकाऊंटमधून पैसे तर निघाले. पण जळलेल्या अवस्थेत. या जळालेल्या नोटांचा विनीमय करणे शक्य नाही, त्यामुळे नागरिक धास्तावलेल्या अवस्थेत दिसले. त्यामुळे परिसरात संताप व्यक्त करण्यात येत होता.