पुणे पुन्हा हादरले, दुसऱ्या दिवशीही खुनाची घटना

  पुण्यात दोन दिवसात दोन खुनाच्या (Pune Murder) घटना घडल्याने शहर हादरुन गेले आहे. 

Updated: May 6, 2021, 11:33 AM IST
 पुणे पुन्हा हादरले, दुसऱ्या दिवशीही खुनाची घटना

 पुणे : कोरोनाचा (Coronavirus) एकीकडे उद्रेक होत असताना पुण्यात दोन दिवसात दोन खुनाच्या (Pune Murder) घटना घडल्याने शहर हादरुन गेले आहे. दुसऱ्या दिवशी  सिंहगड रोड परिसरात मध्यरात्री टोळक्याने कडून तरुणाचा खून करण्यात आला. तलवारीने सपासप वार केल्याने एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ( Pune Police) ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हल्लेखोरांनी 24 वर्षीय तरुण शाम सोनटक्केचा खून केला तर 19 वर्षीय योगेश चव्हाण हा हल्लेखोरांच्या हल्लात  गंभीर जखमी झाला आहे. योगेश आणि शाम यांच्यासह त्यांच्या मित्रांची दारूची पार्टी  सुरु होती. पार्टी सुरू असतांनाच पूर्ववैमनस्यातून टोळक्याने हल्ला केला केल्याचे सांगण्यात येत आहे. मोन्या पोकळे असे मुख्य संशयिताचे नाव आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. मोन्या पोकळे याच्यासह त्याच्या साथीदारांचा पोलीस शोध घेत आहे.

दरम्यान, पोलीस अधिकाऱ्याचा खून  करण्यात आल्याची घटना घडली. सहाय्यक फौजदार समीर सय्यद यांचा खून करण्यात आला. सय्यद फरासखाना पोलीस ठाण्यातील अधिकारी आहेत. 
मध्यरात्री बुधवार पेठेतील ही घटना घडली. या खूनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. अधिक चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे.