नागपुरात खूनीखेळ...रात्री केलेल्या खूनाच्या बदला घेण्यासाठी सकाळी गुंडाला संपविण्याचा प्रयत्न

   राज्याची क्राईम कॅपिटल म्हणून नको असलेली ओळख नागपुरला मिळाली आहे.

Updated: Jul 24, 2021, 06:32 PM IST
नागपुरात खूनीखेळ...रात्री केलेल्या खूनाच्या बदला घेण्यासाठी सकाळी गुंडाला संपविण्याचा प्रयत्न
स्वंयम आणि शक्तीमान

नागपूर  :  राज्याची क्राईम कॅपिटल म्हणून नको असलेली ओळख नागपुरला मिळाली आहे.शहरातल्या  गुन्हेगारी घटना पोलिसांचा वचक संपल्याचं दिसून येतंय. शुक्रवारी रात्री स्वयम या तरुणाची हत्या झाली. त्याचा वचपा काढण्यासाठी त्याच्या मित्रांनी आठ तासात स्वयंदीपच्या हत्येत सहभागी गुंडाला शोधलं, आणि त स्वयम्  हत्या झाले ल्केया ठिकाणी आणून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हादरवून सोडणारी या घटना नागपुरातील अजनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.  शक्तीमान असं या घटनेत गंभीर जखमी असलेल्या कुख्यात गुंडाचं नाव आहे..याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं

शहरातील अजनी पोलिस स्टेशनच्या हद्दीत कौशल्यानगर येथे शक्तीमानने गँग तयार करून दहशत निर्माण केली होती.याप्रकऱणी मिळालेल्या माहितीनुसार शक्तीमान उर्फ शिवम गुरूदेव आणि स्वयम्  नगराळे यांच्यात वाद होता.गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यात कुरुबुरी सुरु होत्या . शुक्रवारी रात्री आपल्या घराजवळ ऑॅटोत बसलेल्या स्वयमवर शक्तीमानने दोन अल्पवयीन आणि अन्य एका आरोपीसह येऊन हल्ला केला. त्याच्या छातीवर तीक्ष्ण शस्रांनी वार केले. या हल्लात स्वयमचा मृत्यू झाला.त्यानंतर दरम्यान  आरोपी फरार झाले.

 खून का बदला खून....कुख्यात शक्तीमानला संपवायचं होतं  

स्वयम नगराळेच्या नाची बातमी विद्युत वेगानं पसरली.अजनी पोलिसांनी याप्रकऱणी दोन अल्पवयीन आरापींसह अन्य एका आरोपीला रात्रीच अटक केली. मात्र मुख्य आरोपी शक्तिमान फरार होता. इकडे स्वयंमच्या मित्रांनी शक्तीमानचा रात्रभर शोध घेऊनही तो सापडला नाही. त्यांच्या मनात  सूडाची भावना भडकली होती. खून का बदला खून या इराद्यानं ते शक्तीमानचा शोध घेत होते. शनिवारी पहाटे शक्तीमान भांडेवाडीत त्याच्या मामाकडे लपून असल्याचे त्यांना समजले.ते भांडेवाडीत जाऊन शक्तीमानला वस्तीत घेऊन आले. नंतर स्वयंमचा खून झाला होता त्याचं परिसरात आणून लोकांदेखत संपवण्याचा प्रयत्न केला..शक्तीमान आता रुग्णालयता दाखल असून तो गंभीर अवस्थेत आहे.मात्र सर्व घटनेमुळं नागपूर पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.