'माझ्या मनात काय आहे हे फक्त त्यांनाच कळतं'

आपली राजकीय भूमिका स्वच्छ असून राजकीय लाईन ठरलेली आहे

Updated: Feb 11, 2018, 05:59 PM IST
'माझ्या मनात काय आहे हे फक्त त्यांनाच कळतं' title=

कोल्हापूर : आपली राजकीय भूमिका स्वच्छ असून राजकीय लाईन ठरलेली आहे, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरात केलंय. माझ्या मनात काय आहे हे माझ्या पक्षातल्या लोकांना कळतं असंही पवार म्हणालेत. यावेळी विविध राजकीय पक्षातील नेत्यांशी असलेल्या सलोख्याच्या संबंधांचा उल्लेख केला.

विशेषतः दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंबरोबरच्या मैत्रीचा त्यांनी आर्वजून उल्लेख केला. बाळासाहेब ठाकरे माझे जवळचे मित्र, अखंड महाराष्ट्राला आमची मैत्री माहित होती. पण ठाकरेंच्या उमेदवाराला मी कधी पाठिंबा दिला नाही आणि त्यांनीही कधी आमच्या उमेदवाराला पाठिंबा दिला नाही. आमची राजकीय "लाईन' ठरलेली असते असही राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी म्हटलय. महाराष्ट्र आणि देशाच्या हितासाठी एकत्र यायचं असेल तसंच पाठिंबा द्यायचा असेल तर त्याबाबत सकारात्मक असल्याचा गुगलीही शरद पवार यांनी यावेळी टाकला.