Nagpur five flyovers: नागपुरकरांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. नागपुरकरांचा नेहमीचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे. कारण नागपूरमध्ये आणखी पाच नवे उड्डाणपूल येणार आहेत. या प्रकल्पासाठी राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने 792 कोटी रुपये मंजूर केले आहेत. 5 नव्या उड्डाणपूलांमुळे पूर्व, मध्य व दक्षिण नागपूरची वाहतूक कोंडी फूटणार आहे. येथील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. अनेक वर्षांपासून या प्रकल्पाची चर्चा होती. आता हा प्रकल्प लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे.
नागपूर शहर वाहतुकीच्य बाबतीत समृद्ध होत चालले आहे. नागपूरमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक उड्डाणपूल तयार झाले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या भाषणांमध्ये याचा उल्लेख करत असतात. सध्या नागपूरच्या इंदोरा ते थेट सक्करदरा उड्डाणपूलांचे काम सुरू आहेत. आता आणखी पाच नव्या उड्डाणपूलाचा वापर नागरिकांना करता येणार आहे.
पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी दक्षिण, पूर्व व मध्य नागपुरातील रस्त्यांवर उड्डाणपूला मागणी केली होती. केंद्रीय रस्ते महामार्गमंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उड्डाणपुलाचे प्रस्तावित काम पुढे नेले. नेत्यांच्या चर्चेनंतर महारेलने पाच उड्डाणपूलांचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. केंद्रीयमंत्री गडकरी, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यापुढे महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जैस्वाल यांनी या उड्डाणपूलांचे सादरीकरण केले होते. सादरीकरणानंतर दोन्ही नेत्यांसह राज्य सरकारने या उड्डाणपूलास मंजुरी दिली असून, महारेल कंपनी बांधकाम करणार आहे. या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, लवकरच बांधकामाला सुरवात होणार आहे.
रेशीमबाग ते केडीके कॉलेज, टेलिफोन एक्सचेंज चौक ते भांडे प्लॉट या उड्डाणपुलासाठी 251 कोटी खर्च केले जाणार आहेत. दुसरा उड्डाणपूरल चंद्रशेखर आझाद चौक-गंगाजमुना ते मारवाडी चौक यासाठी 66 कोटी इतका खर्च केला जाईल. लकडगंज पोलिस स्टेशन ते वर्धमाननगर या उड्डाणपुलासाठी 135 कोटी खर्चास मंजुरी मिळाली आहे. नंदनवन, राजेंद्रनगर चौक ते हसनबाग चौक उड्डाणपुलासाठी 66 कोटी तर वर्धमाननगर ते निर्मलनगरी, उमरेड रोड या उड्डाणपूल प्रकल्पासाठी 274 कोटी खर्च केला जाणार आहे.
पूर्व, मध्य व दक्षिण नागपुरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. नागरिकांसाठी ही मोठी समस्या बनली होती, असे आमदार कृष्णा खोपडे यांनी सांगितले. या उड्डाणपूलाच्या आवश्यकतेकडे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधल्यातेही ते म्हणाले. या उड्डाणपूलाच्या सादरीकरणानंतर दोन्ही नेत्यांनी तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या उड्डाणपूलांना मान्यता दिली असून, नगरविकास विभागाने 792 कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती आमदार खोपडे यांनी दिली.
नागपूर शहरातील या पाच उड्डाणपूलासाठी महारेलने प्रस्ताव तयार केला होता. केंद्रीयमंत्री गडकरी, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यापुढे महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जैस्वाल यांनी या उड्डाणपूल प्रकल्पाचे सादरीकरण केले होते. यानंतर गडकरी, फडणवीस यांच्यासह राज्य सरकारने या उड्डाणपूल प्रकल्पास मंजुरी दिल्याची माहिती देण्यात आली आहे. शहरातील प्रस्तावित 2 उड्डाणपूलांचे बांधकाम महारेल कंपनी करणार आहे. प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली असून काही दिवसात बांधकामही सुरु होईल अशी माहिती देण्यात आली.
|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.