Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. सरकारला एकाचा बळी घ्यायचा असेल तर घेऊ द्या, असं सांगताना जरांगे यांचे डोळे पाणावले. जीवाला काही झालं तरी चालेल पण समाजााला न्याय मिळाला पाहिजे, आपल्या लेकरांना न्याय देण्याची हीच संधी आहे. असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. यावेळी ग्रामस्थांनी पाणी पिण्याचा हट्ट धरला. पाणी प्यायचा हट्ट केला तर आपल्या लेकरांना न्याय कसा मिळणार, तुम्ही असा हट्ट धरला तर आपल्या लेकरांना न्याय मिळेल का? आरक्षणासाठी आपला लढा सुरु राहिल असं जरांगे यांनी म्हटलं. अखेर ग्रामस्थांच्य हट्टापोटी पाणी पिणार असल्याचं त्यांनी सांगतिलं, पण उपोषाणवर ते ठाम आहेत.
ज्यांच्याकडे कुणबी पुरावे आहेत त्यांना सरकार उद्यापासून प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करणार असल्याची घोषणा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली. पण सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Certificate) द्या या मागणीवर ठाम राहात मनोज जरांनी सरकारचा प्रस्ताप फेटळला आहे. सर्व मराठे एकच आहेत, अर्धे तुमचे, अर्धे आमचे असे नाहीत, महाराष्ट्रातल्या सर्व मराठ्यांना आरक्षण देत नाह तोपर्यंत आंदोलन थांबवणार नसल्याचं जरांगे पाटी यांनी स्पष्ट केलं आहे.
सरकारने आमचं शांततेलं आंदोलन पाहिलं आहे. आता आंदोलनचा तिसरा टप्पा 1 नोव्हेंबरपासून सुरु होईल मग तर तर त्यांना बैठकाही घेता येणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांच्या घरात शिरुन आवारातल्या गाड्या पेटवून दिल्या. यावर बोलताना सोळंके कधी सोसायटीच्या निवडणुकीतही निवडून येऊ शकत नाही. तो मराठा समाजाच्या जीवावर आमदार झालाय, ते आधी काहीतरी बोलले असणार म्हणून मराठा समाज आक्रमक झाला असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. मराठ्यांच्या वाट्यााल जाऊ नका असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे.
मराठ्यांच्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न सुरु आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वाचाळ लोकांना आवरावं असं आवाहनही जरांगे पाटील यांनी केलं आहे. क्युरेटिव्ह पिटीशनचा आणि आणचा काहीही संबंध नाही. आम्ही अर्धवट आरक्षण घेणार नाही असंही मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला ठणकावलं आहे.