प्रेयसीसाठी चोरली मांजर, पोलिसांनी दोघांना केली अटक

पोलिसांनी केली जोडप्याला अटक

Updated: Apr 27, 2019, 05:34 PM IST
प्रेयसीसाठी चोरली मांजर, पोलिसांनी दोघांना केली अटक title=

नागपूर : प्रेमात कोण काय करेल, याचा काही भरवसा नसतो. प्रेयसीची इच्छा पूर्ण करण्यासाठी नागपूरमधल्या एका प्रेमवीरानं चक्क एक मांजर चोरली. पर्शियन जातीची ३० हजार रुपये किंमतीची ही मांजर आहे. पोलिसांनी याप्रकरणी प्रियकर हर्शल आणि प्रेयसी विलेशा यांना अटक केली आहे.

मांजराला मूळ मालकाच्या स्वाधीन करण्यात आलं आहे. डॉ. शाहीद यांच्या मालकीची ही मांजर पाहण्यासाठी विलेशा बऱ्याचदा त्यांच्या घराजवळ जायची. प्रेयसीचा हा हट्ट पुरवण्यासाठीच ही चोरी केल्याचं प्रियकर हर्शलनं म्हटलं आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.