चिमुरड्यांच्या प्रश्नांना मुख्यमंत्री आणि गडकरींची दिलखुलास उत्तरे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नागपुरात दोन चिमुरडींनी विचारलेल्या प्रश्नांनी चांगलेच पेचात पाडले. 

Updated: Dec 17, 2017, 03:08 PM IST
  चिमुरड्यांच्या प्रश्नांना मुख्यमंत्री आणि गडकरींची दिलखुलास उत्तरे  title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : विरोधी पक्षातील नेत्यांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरे देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नागपुरात दोन चिमुरडींनी विचारलेल्या प्रश्नांनी चांगलेच पेचात पाडले. 

चिमुरडींनी घेतली मुलाखत 

राजाराम सीताराम दीक्षित वाचनालय आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या बाल साहित्य संमेलनाचे उद्घाटनप्रसंगी दोन चिमुरडींनी मुख्यमंत्री आणि गडकरींची प्रकट मुलाखत घेतली.

यावेळी चिमुरड्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्याच निरागसतेने दोघांनी दिलखुलास उत्तरे दिली.

'आता मी जास्त खात नाही'

 तुम्ही खवय्ये म्हणून प्रसिद्ध आहात ? खाण्यामध्ये काय आवडत असा प्रश्न नितीन गडकरी यांना विचारण्यात आला. त्यावेळी, 'आता मी जास्त खात नाही. आधी माझ वजन १३० कि. होतं पण आता ९१ किलो असल्याचे' गडकरींनी सांगितले.

मुख्यमंत्री चॉकलेटसाठी भांडतात

'तुम्ही मुलीला चॉकलेट घेऊन देता का ? ती तुमच्याकडे चॉकलेटसाठी भांडते का ?' असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला गेला. त्यावर उत्तर देताना, नाही. 'मला चॉकलेट खूप आवडत. म्हणून मीच तिच्याशी चॉकलेटसाठी भांडतो. मग ती मला चॉकलेट देते' अस मिश्किल उत्तर त्यांनी दिलं.

मुख्यमंत्री म्हणजे काय ? काय काम असत ओ काका ?

मुख्यमंत्र्यांना काय काम नसतं ? हे विचार. सगळीच कामं असतात. मुख्यमंत्री, पंतप्रधान म्हणजे मालक असे पूर्वी लोक समजायचे. पण पंतप्रधानांनी सांगितलय त्याप्रमाणे पंतप्रधान, मुख्यमंत्री हे सेवक आहेत. महाराष्ट्राची सेवा करणे हे काम आहे.

काका, तुमचे हॅलिकॉप्टर वारंवार का बिघडते ? त्याच रहस्य काय ? 

काका तुमचे हॅलिकॉप्टर वारंवार का बिघडते ? असा प्रश्न यावेळी विचारला. 'मलाही अजून याचे उत्तर सापडले नाही. मी पण तेच शोधतोय' असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले. 

'भारत सोडून सगळ्या देशाचे रस्ते सुंदर'

'तुम्ही मोठमोठ्या देशातले रस्ते पाहिले , त्यातले कोणत्या देशाचे रस्ते सुंदर आहेत ?' असा प्रश्न गडकरींना विचारण्यात आला. त्यावेळीभारत सोडून सगळ्याच देशाचे रस्ते सुंदर आहेत असे उत्तर गडगरींनी दिले.

मोठ होण्यासाठी काय कराव ?

'डर के आगे जीत है' अशी एक जाहिरात लागते. त्यातल या वाक्याचा आयुष्यात अवलंब केल्यास यश मिळत जात. जे काही करायच ते मेहनत आणि प्रामाणिकपणे करायच यश तुमचच आहे,'असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं. 

पंतप्रधान व्हायला आवडेल का ?

'दिल्लीची राजधानी नागपुरात येईल का? आणि आल्यास तुम्हाला पंतप्रधान व्हायला आवडेल का ?' असा प्रश्न गडकरींना विचारला गेला.

सध्याचे पंतप्रधान तेच चांगले आहेत. मी प्रयत्न केल्यास नविन अडचणी होती. मी जिथे आहे तिथेच ठिक आहे. नागपुरात राजधानी येण्याची शक्यता मला वाटत नाही. असे उत्तर त्यांनी दिले.

भारत महासत्ता होईल का ? त्यासाठी लोकांनी काय करावे ?

 जाती, धर्म विसरुन देश म्हणून सर्व एकत्र येतील तेव्हा भारत महासत्ता होईल असे उत्तर गडकरींनी दिले.