1, 2 नव्हे तर तब्बल 78 कोटी, उपराजधानीत सुरू होता भयंकर प्रकार, पोलिसांनी धाड टाकताच...

Nagpur Crime News: नागपूरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थ तयार करणाऱ्या फॅक्टरीतून 78 कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.   

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 12, 2024, 08:25 AM IST
1, 2 नव्हे तर तब्बल 78 कोटी, उपराजधानीत सुरू होता भयंकर प्रकार, पोलिसांनी धाड टाकताच...   title=
Nagpur crime news Officials bust mephedrone factory in Nagpur find 52 kg drugs

Nagpur Crime News: राज्याच्या उपराजधानीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थ तयार करणाऱ्या फॅक्टरीवर DRIने कारवाई केली आहे. या कारवाईनंतर आत्तापर्यंत 78 कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहेत. तर, 50 किलोपेक्षा जास्त साठा जप्त करण्यात आला आहे. या घटनेने नागपूर पुन्हा एकदा हादरले आहे. DRIने या प्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे. तर, या प्रकरणात पुढील तपास सुरू असून अनेक धक्कादायब बाबी समोर आल्या आहेत. 

डायरेक्टरेट ऑफ रेवेन्यू इंटेलिजन्स (DRI)च्या मुंबई विभागीय पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे नागपूर शहरातील पाचपावली भागात एक बांधकामाधीन इमारतीमध्ये अवैधपणे सुरू असलेली एमडी ड्रग्स तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकली आहे. या कारखान्यातून तब्बल कारखान्यातुन तब्बल ७८ कोटी रुपये किमतीचे मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. 

डायरेक्टरेट ऑफ रेवेन्यू इंटेलिजन्स (DRI)ने या फॅक्टरीत धाड टाकल्यानंतर तब्बल 51 किलो 95 ग्रॅम इतक्या मोठ्या स्वरुपात मेफड्रोन द्रव स्वरुपात जप्त करण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे आरोपींनी या कारखान्यातच मेफेड्रोन ड्रग्सच्या निर्मितीसठी आवश्यक रसायने, साहित्य व यंत्रसामग्रीने सुसज्ज असलेली एक छोटी प्रयोगशाळा तयार केली होती.

या प्रकरणी ड्रग्स सिंडिकेटचा मास्टरमाइंड आणि फायनान्सर व त्याच्या तीन साथीदारांना अटक करण्यात आली असून आरोपींना पुढील चौकशीसाठी डीआरआय कोठडीत पाठवण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे एमडी ड्रग्स तयार करणाऱ्या मास्टरमाइंडने १०० किलोपेक्षा ही जास्त मेफेड्रोन तयार करण्याची क्षमता असलेला कच्चा माल गोळा केला होता. याशिवाय क्रिस्टलाइज्ड पावडरवर पुढील प्रक्रिया सुरू होती. मात्र DRIच्या पथकाने वेळेत छापा टाकल्यामुळं मोठा कट उधळण्यात आला आहे. NDPS कायदा, 1985 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.