नागपूरमधील धान्य गोदामाची आग आटोक्यात

नागपूरमधल्या कळमना परिसरातल्या धान्य गोदामाला लागलेली आग अखेर आटोक्यात आली आहे. या आगीमुळे इमारतीचा काही भाग दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमाराला कोसळला. 

Updated: Feb 24, 2018, 08:40 PM IST
नागपूरमधील धान्य गोदामाची आग आटोक्यात  title=

नागपूर : नागपूरमधल्या कळमना परिसरातल्या धान्य गोदामाला लागलेली आग अखेर आटोक्यात आली आहे. या आगीमुळे इमारतीचा काही भाग दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमाराला कोसळला. 

अॅकॅलिप्स्टो अॅग्रो नावाच्या कंपनीच्या या गोदामात सुमारे 35 हजार क्विंटल तूर डाळ, 15 हजार क्विंटल तांदूळ, आणि 10 हजार क्विंटल गहू साठवण्यात आले होते.

धान्य भस्मसात

आगीमध्ये हे सारं धान्य भस्मसात झालं आहे. गोदामाच्या इमारतीला पहाटे तीन ते साडेतीन वाजण्याच्या दरम्यान आग लागली.

अग्निशमन दलाच्या प्रसंगावनधानामुळे जीवितहानी टळली. मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे. आगीचं नेमकं कारण अजून समोर आलेलं नाही.