नागपुरात गुंडांची हॉटेल मालकाला मारहाण, दृश्यं सीसीटीव्हीत कैद

 नागपुरातील एका हॉटेल मध्ये गुंडांनी तोडफोड करीत हॉटेल मालकाला जबर मारहाण केली.

Updated: May 25, 2018, 01:54 PM IST

नागपूर : नागपुरातील एका हॉटेल मध्ये गुंडांनी तोडफोड करीत हॉटेल मालकाला जबर मारहाण केली. मारहाणीची ही दृश्यं सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. नागपूरच्या बजाज नगर परिसरात 'हॉटेल बैठक' नावाच्या रेस्टारंटमध्ये गुरवारी रात्री ७ ते ८ जण आले आणि तिथे बसलेल्या हॉटेल मालक डेव्हिड याला मारहाण करण्यास सुरवात केली. हॉटेल मालकाच्या बचावासाठी आलेल्या हॉटेल कर्मचाऱ्यांना देखील या गुंडांनी मारलं. हॉटेलमध्ये राडा करत टेबल खुर्च्यांची देखील तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी ६ आरोपिंविरुद्द हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केलाय.

आरोपींची ओळख पटली 

सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटली आहे. हॉटेल मालक डेविड याला या हल्ल्यात जबर दुखापत झाली असून खाजगी रुग्णालयात त्याचावर उपचार सुरु आहेत.