तुम्ही येताय ना, नागपूर मेट्रोच्या 'प्री लाँच जॉय राईड'ला!

मुंबई पाठोपाठ नागपूरचीही मेट्रो धावणार आहे. मेट्रोची प्री लाँच जॉय राईड शुक्रवारी होणार आहे. 

Updated: May 3, 2018, 10:23 PM IST
तुम्ही येताय ना, नागपूर मेट्रोच्या 'प्री लाँच जॉय राईड'ला! title=

नागपूर : राज्यातली दुसरी मेट्रो आता लवकरच धावणार आहे... मुंबई पाठोपाठ नागपूरचीही मेट्रो धावणार आहे. मेट्रोची प्री लाँच जॉय राईड शुक्रवारी होणार आहे. यापूर्वी २१ एप्रिलला एअरपोर्ट साऊथ ते खापरी मेट्रो स्टेशनपर्यंत नागपुरातील मूकबधीर मुलं, वयोवृद्ध आणि अनाथ यांच्यासाठी मेट्रो रेल्वेनं प्री जॉय राईड आयोजित केली होती.

आता त्यानंतर होणारी ही दुसरी जॉय राईड असणार आहे. एअरपोर्ट साऊथ, न्यू एअरपोर्ट आणि खापरी या स्थानकांदरम्यान या जॉय राईडचा आनंद लुटता येईल.