नागपूरकरांसाठी गुड न्यूज! मेट्रोचा मार्ग वाढला

नागपूरकरांसाठी एक गुडन्यूज. भविष्यातील गरज ओळखून नागपूर मेट्रोचा मार्ग तीन किलोमीटरने वाढवलाय. या परिसरात आणखी स्टेशन्स उभारण्यात येणार आहेत.   

Updated: Nov 27, 2017, 11:33 PM IST
नागपूरकरांसाठी गुड न्यूज! मेट्रोचा मार्ग वाढला  title=

अमर काणे, प्रतिनिधी, झी मीडिया, नागपूर : नागपूरकरांसाठी एक गुडन्यूज. भविष्यातील गरज ओळखून नागपूर मेट्रोचा मार्ग तीन किलोमीटरने वाढवलाय. या परिसरात आणखी स्टेशन्स उभारण्यात येणार आहेत.

शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी नागपूर मेट्रोची भूमिक महत्वाची ठरणार आहे. त्यादृष्टीने मेट्रोचे कामही जोमात सुरु असताना  नागपूर मेट्रो रेल्वे आता 38.5 कि़मीऐवजी 41.5 कि़मी धावणार आहे. त्यामुळे आता 36 स्टेशनच्या तुलनेत आता  मार्गात 40 स्थानके राहणार आहेत.

भविष्यातील गरज ओळखून तसंच मिहानमध्ये येत असलेल्या अनेक आंतरराष्ट्रीय कंपनी, एम्स, आयआयएम यांसह अनेक शैक्षणिक आणि इतर संस्थापर्यंत कनेक्टिव्हीटीच्या दृष्टीने हे नवीन स्टेशन्स महत्वाचे ठरणार आहेत.

मेट्रो डेपोच्या पुढे  तीन किलोमीटर मेट्रो मार्गाचा विस्तार करताना सुरुवातीला इको पार्क स्टेशन, त्यानंतर मेट्रोतर्फे विकसीत करण्यात येणा-या मेट्रो सिटीतील रहिवाशांसाठी मेट्रो सिटी स्टेशन राहणार आहे. तर तिसरे मेट्रो स्टेशन कॉटन मार्केट चौकात राहणार आहे.

मेट्रोने केलेल्या बचतीतीतून या तिन्ही स्टेशनची उभारणी करण्यात येणार आहे. याशिवाय नागपूर मेट्रोचे तिकीट दर नियंत्रणात रहावे म्हणून मेट्रो रेल्वे शहरातील मोक्याच्या जागेचा व्यावसायिक तत्वावर वापर करणार आहे. मोक्याच्या स्थानकांवरील व्यावसायिक वापरामुळे मिळणा-या उत्पन्नामुळे तिकीट दरही नियंत्रणात ठेवता येणार आहे.