close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

नागपूर महापालिकेची भक्तांसाठी 'विसर्जन तुमच्या दारी' संकल्पना

बाप्पाच्या विसर्जनाची तयारी सर्वत्र सुरु झाली असताना, नागपूर महानगर पालिकेनं `विसर्जन तुमच्या दारी' संकल्पना राबवत बाप्पाच्या भक्तांसाठी विसर्जन अधिकच सोपं केलं आहे. 

Updated: Sep 4, 2017, 08:17 PM IST
नागपूर महापालिकेची भक्तांसाठी 'विसर्जन तुमच्या दारी' संकल्पना

नागपूर : बाप्पाच्या विसर्जनाची तयारी सर्वत्र सुरु झाली असताना, नागपूर महानगर पालिकेनं `विसर्जन तुमच्या दारी' संकल्पना राबवत बाप्पाच्या भक्तांसाठी विसर्जन अधिकच सोपं केलं आहे. 

नागपूर महापालिकेनं विसर्जनाकरता मोबाईल व्हॅनची व्यवस्था केली आहे. ही व्यवस्था करणारे नागपूर हे राज्यातील एकमेव शहर असून अशा प्रकारे विसर्जनाची सोय नागपूरकरांच्या दारी आली आहे. 

पालिकेच्या अधिकाऱ्यांना ठराविक मोबाईल क्रमांकावर कॉल केले तर ही व्हॅन घरी हजर होते.