तुमचा परफ्युम बोगस नाही ना?, धक्कादायक वास्तव समोर

रिकाम्या बाटल्यांमध्ये बोगस परफ्युम भरणारे रॅकेट

Updated: Jan 30, 2021, 07:31 PM IST
तुमचा परफ्युम बोगस नाही ना?, धक्कादायक वास्तव समोर  title=

अमर काणे, झी २४ तास नागपूर : तुम्ही वापरताय तो परफ्युम बोगस नाही ना?... बोगस परफ्युमचा सुगंध तुमच्यासाठी जीवघेणा ठरु शकतो. कारण ब्रँडेड परफ्युम कंपन्यांच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये बोगस परफ्युम भरणाऱ्या रॅकेटचा नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केलाय. 

खामल्यात आरोपीच्या घरातल्या कारखान्यात रिकाम्या बाटल्यांमध्ये बोगस परफ्युम भरलं जात होतं. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये केमिकलही वापरलं जातं होतं. पोलिसांनी संजयकुमार शर्मा या आरोपीला अटक केलीय.

बोगस बॉडी स्प्रेमधील केमीकलमुळं त्वचारोग आणि उग्रवासामुळं श्वसनाचे आजारही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पोलिसांनी बोगस परफ्युमचा एक कारखाना उद्धवस्त केलाय. पण राज्यातील अनेक शहरात गोदीचा माल म्हणून बोगस परफ्युम विकला जातोय. 

अशा विक्रेत्यांवर आणि विषारी सुगंध बनवणाऱ्या कारखान्याची पाळंमुळं खणूण काढण्याची गरज निर्माण झालीय.