नांदेड : सरकारने केलेल्या बदलीला आव्हान देण्याची कृती नांदेडमधल्या ५३ शिक्षकांच्या चांगलीच अंगलट आली आहे.
नांदेड जिल्हा परिषदेच्या ५३ शिक्षकांच्या जून २०१६ मध्ये प्रशासकीय बदल्या झाल्या होत्या. नांदेड जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भाग असलेल्या किनवट आणि माहुर तालुक्यात त्यांच्या बदल्या झाल्या.
मनाविरोधात बदल्या झाल्यानं ५३ गुरुजींनी कामावरू रूजून न होता, औरंगाबाद उच्च न्यायलयात धाव घेतली. पण त्या सगळ्या गुरुजींनाच न्यायालयानं शिक्षा केली आहे. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान केल्याबद्दल तंबी देतानाच प्रत्येकी १५ हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला.
बदली झाल्याच्या दिवसापासुनचा पगार रोखण्यात आला. जे शिक्षक रुजू झाले नाहीत त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेशही न्यायालयानं दिलेत.