नंदुरबार : नंदुरबार वन विभागाला तस्करांविरोधात मोठे यश मिळालंय.. नंदूरबार - शहादा रस्त्यावरून वन्यजीव आणि त्यांच्या कातडीची तस्करी केली जाणार असल्याची माहिती वन्यजीव संरक्षण विभागाला मिळाली. त्यानुसार वन विभागाने प्रकाशा गावाजवळ तापी नदीच्या पुलावर नाका बंदी केली.
या नाकाबंदीत तिघांची झडती घेतली असता त्यांच्याकडून एक जिवंत मांडूळ जातीचा साप, एक बिबट्याची कातळी आणि एक अन्य प्राण्याची कातडी सापडली.. यावरुन वनविभागानं या तिघांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.