सिंधुदुर्ग : दीर्घ काळ वाट पाहण्याची आपल्याला सवय नाही, लवकरच मंत्रिमंडळात असू असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
तसेच लांबलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर, आणि मंत्रीपदाबाबत बोलताना, राणे यांनी आपण लवकरच मंत्रिमंडळात असू, असा दावाही केला आहे.
आज कुडाळमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये नारायण राणे यांनी घोषणा केली आहे, नवा पक्षा स्थापन केलेल्या नारायण राणे यांनी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 3 विधानसभा आणि लोकसभेवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
स्वाभिमान पक्षाची नोंदणी 1 फेब्रुवारीपासून सुरु होणार असल्याचंही यावेळी नारायण राणे यांनी जाहीर केलं आहे.
कोकणात होऊ घातलेला रिफायनरी प्रकल्प जर पर्यावरणाला घातक ठरणारा असेल, तर तो प्रकल्प होऊ देणार नाही, अशीही भूमिका देखील नारायण राणे यांनी घेतली आहे.