मोदींनी मीडिया विकत घेतला - प्रणिती शिंदे

काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी थेट पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल चढवला.  

Updated: Mar 22, 2019, 04:49 PM IST
मोदींनी मीडिया विकत घेतला - प्रणिती शिंदे

सोलापूर : काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी थेट पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल चढवला. देशातील मीडिया भाजप आणि पंतप्रधान मोदींनी विकत घेतला आहे. भाजपची बाजू रंगवून दाखविण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे नेमके सत्य काय हे समाजासमोर येऊ दिले जात नाही. त्यामुळे पहिल्यांचा मतदान करणाऱ्यांना सत्य समजणार नाही, असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ सोलापूर लोकसभा मतदार संघातील कांसेगाव येथे काँग्रेसतर्फे घेण्यात आलेल्या सभेत बोलत होत्या. प्रणिती शिंदे देखील आपल्या वडिलांच्या प्रचारासाठी आल्या होत्या. या सभेत प्रणिती यांनी माध्यमांना लक्ष्य केले.

भाजपकडून माध्यमांना पैसे दिले जातात आणि खोट्या गोष्टी किती छान आहेत हे पटवून दिले जाते. सत्य काय हे दडविले जाते ते लोकापर्यंत येऊ दिले जात नाही. भाजपच्या या नितीमुळे मतदारांमध्ये आणि खास करुन तरुणांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचा गंभीर आरोप प्रणिती यांनी यावेळी केला.