नाशिक : नाशिक महापालिका आयुक्तपदावरून तुकाराम मुंढेंची नेमकी उचलबांगडी का झाली? त्यांना नाशिकमध्ये काम करताना काही त्रास झाला का? कुणाकडून? अशा अनेक प्रश्नांवर पहिल्यांदाच तुकाराम मुंढेंनी 'झी २४ तास'समोर प्रतिक्रिया व्यक्त केलीय.
शिस्तप्रिय आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ओळख असणारे प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांना नाशिकच्या आयुक्तपदावरून हटवण्यात आलंय. यानंतर तुकाराम मुंढेंची सहसचिव म्हणून मंत्रालयात बदली करण्यात आलीय.
नाशिक मगहानगरपालिकेचा कारभार हाताळणाऱ्या आयुक्त तुकाराम मुंढे यांना शासनाकडून बदलीचं पत्र हाती मिळालंय. 'शासनानं आपली बदली केली असून आपली नियुक्ती सह सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय मुंबई या रिक्त पदावर केली आहे. तरी आपण आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार जिल्हाधिकार, नाशिक यांच्याकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार त्वरित स्वीकारावा' असा मजकूर या पत्रात दिसतोय.