नाशिककरांवर दु:खाचा डोंगर! एका आठवड्यात दुसऱ्या जवानाला वीरमरण

Nashik News : निफाड तालुक्याच्या उगाव येथील रहिवासी असलेले आणि मरळगोई खुर्द येथे राहणारे भारतीय सैन्य दलातील जवान जनार्दन उत्तम ढोमसे (Janardan Dhomase) यांना वीरमरण आले आहे. जम्मू काश्मीर (Jammu Kashmir) येथे कर्तव्यावर असताना ते देशासाठी शहीद झाले आहेत.

Updated: Dec 28, 2022, 09:17 PM IST
नाशिककरांवर दु:खाचा डोंगर! एका आठवड्यात दुसऱ्या जवानाला वीरमरण  title=

Nashik News : नाशिकच्या सारंग अहिरे (Sarang Ahire) या भारतीय जवानाच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच आता जिल्ह्यात आणखीण एक जवान शहीद झाला आहे. जनार्दन उत्तम ढोमसे असे या शहीद जवानाचे नाव आहे. जम्मू काश्मीर (Jammu Kashmir) येथे कर्तव्यावर असताना त्यांना वीरमरण आले आहे. या घटनेने निफाडसह उगाव परिसरात शोककळा पसरली आहे. 

हे ही वाचा : लष्करातील जवान घरी परतला पण तिरंग्यात....पंचक्रोशीत पसरली शोककळा, नाशिक जिल्ह्यातील घटना

निफाड तालुक्याच्या उगाव येथील रहिवासी असलेले आणि मरळगोई खुर्द येथे राहणारे भारतीय सैन्य दलातील जवान जनार्दन उत्तम ढोमसे (Janardan Dhomase) यांना वीरमरण आले आहे. जम्मू काश्मीर (Jammu Kashmir) येथे कर्तव्यावर असताना ते देशासाठी शहीद झाले आहेत.आज सायंकाळी उशिरा त्यांचे पार्थिव उगाव गावी येणार आहे. तर उद्या सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे उगाव, मरळगोई खुर्द या गावासह परिसरातील गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

सैन्यातून निवृत्त होणार होते...

जनार्दन ढोमसे (Janardan Dhomase) यांची सैन्य दलातील सेवा तीन वर्षानंतर संपणार होती. मात्र त्यापुर्वीच त्यांना वीरमरण आले आहे. जनार्दन ढोमसे यांच्या पश्चात आई-वडील, आजी-आजोबा तसेच पत्नी रोहीणी, मुलगा पवन (वय 8), मुलगी आरु (वय 2 ), भाऊ दिगंबर, चुलते व चुलती असा परिवार आहे. 

असे सैन्य दलात भरती झाले

जनार्दन ढोमसे (Janardan Dhomase) यांचे प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण हे उगांव येथे झाले होते. 12 वी नंतर जनार्दन हे भारतीय सैन्य दलात दाखल झाले. त्याआधी त्यांनी लातुर येथे भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी अकॅडमीत प्रवेश घेतला होता. 2006-07 मध्ये सर्वप्रथम कच्छभोज त्रिपुरा आसाम आणि आता जम्मू काश्मीर येथे सेवा बजावत होते. मात्र या दरम्यान त्यांना वीरमरण आले. 

दरम्यान मंगळवारी बागलाण तालुक्यातील सारंग अहिरे हा जवान आसाम राज्यात सीमेवर कार्यरत असताना त्याचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा निफाड तालुक्यातील जनार्दन ढोमसे शहीद झाले होते. जवान ढोमसे यांच्या निधनाने नाशिकसह निफाड तालुकाव उगाव आणि मरळगोई गावावर शोककळा पसरली आहे.