close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

झी इम्पॅक्ट : पगार पालिकेचा पण चाकरी नेत्यांची, कर्मचाऱ्यांवर कारवाई

नेत्यांच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांचा शोध महापालिका प्रशासनाकडून घेतला जातोय

Updated: Mar 27, 2019, 12:00 PM IST
झी इम्पॅक्ट : पगार पालिकेचा पण चाकरी नेत्यांची, कर्मचाऱ्यांवर कारवाई

किरण ताजणे, झी २४ तास नाशिक : नाशिक महापालिकेचा पगार घेऊन नेत्यांच्या घरी चाकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आता कारवाई होणार आहे. नेमणूक नसताना नेत्यांसाठी काम करणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांचा 'झी २४ तास'नं पर्दाफाश केला होता. त्यानंतर आता कारवाई सत्र सुरू करण्यात आलंय. नाशिक महापालिकेचा पगार घेऊन नेत्यांच्या घरी चाकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आता कारवाई होणार आहे. नेमणूक नसताना नेत्यांसाठी काम करणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांचा 'झी २४ तास'नं पर्दाफाश केला होता. 'झी २४ तास'च्या बातमीनंतर खडबडून झालेल्या महापालिका प्रशासनानं अशा कर्मचाऱ्यांचा शोध घ्यायला सुरुवात केलीय. महापौर कार्यालयात नियुक्ती असलेल्या पण एका बड्या नेत्याच्या बंगल्यावर तैनात असलेल्या रवी सोनावणे नावाच्या कर्मचाऱ्याला महापालिका आयुक्तांनी निलंबित केलं असल्याची माहिती नाशिक मनपा अतिरिक्त आयुक्त हरिभाऊ फडोळ यांनी दिलीय. 

नेत्यांच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांचा शोध महापालिका प्रशासनाकडून घेतला जातोय. २००५ पासूनचे महापौर आणि नगरसचिवांचीही या प्रकरणात चौकशी केली जाणार आहे. 

नेत्यांकडे काम करणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांची संख्या बरीच मोठी आहे. त्यामुळे एक दोघांवर नाही तर सरसकट सर्वांवरच कारवाईची मागणी होतेय.