Nashik News : भोगीला चिमुकल्यावर ओढवली संक्रांत, पतंगाच्या मोहामुळे गमावला जीव, पाहा काय झालं?

Nashik Incident News :नाशिकमध्ये पतंग काढायला गेलेल्या मुलाचा विजेच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

सौरभ तळेकर | Updated: Jan 14, 2024, 08:56 PM IST
Nashik News : भोगीला चिमुकल्यावर ओढवली संक्रांत, पतंगाच्या मोहामुळे गमावला जीव, पाहा काय झालं? title=
boy who remove a kite stuck on wires died due to electric shock

Boy died due to electric shock : नाशिकमध्ये मकर संक्राती (Makar Sankranti 2024) पूर्वसंध्येला एक दुःखद घटना घडली आहे. पतंग उडवितांना विजेच्या तारांचा झटका लागून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता नाशकात (Nashik Incident News) खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. विजेच्या तारांवरील अडकलेली पतंग काढायला गेलेल्या चिमुकल्यावर काळाने घात केला. भाग्येश विजय वाघ असं मयत मुलाचं नाव आहे.  समोर आलेल्या या घटनेनंतर पालकांना सतर्क राहण्याचं आव्हान करण्यात येतंय.

नेमकं काय झालं?

नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील रविवारी दुपारी साडेतीन वाजता काही मुलं पतंग उडवत होती. मुलांचा खेळ रंगात आला होता. त्याचवेळी भाग्येशची पतंग अडकली. अडकलेली पतंग काढण्यासाठी आलेल्या भाग्येशची घडपकड सुरू झाली. त्यावेळी त्याने अडकलेली पतंग काढण्यासाठी एका स्टीलच्या रॉडचा आधार घेतला. मात्र, विजेचा धक्का लागला अन् भाग्येशला जोराचा झटका बसला.

शेजारपाजाऱ्यांनी तातडीने मदत पोहोचवली अन् उपचारासाठी त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं. मात्र, रुग्णालयात पोहोचवल्यावर त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. भाग्येश हा इयत्ता दहावीत शिकत होता. त्याच्या मागे आई, वडील आणि भाऊ असं कुटूंब आहे.

आणखी वाचा - Pune Fire : पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात लागली भीषण आग, 2 सिलेंडरचा स्फोट; फायर ब्रिगेडकडून शर्थीनं प्रयत्न!

दरम्यान, नायलॉन मांजामुळे मागील आठवड्यात जखमी होण्याचे प्रकार घडले आहेत. तरीही मांजराचा वापर सर्रास सुरूच असल्याचं समोर येतंय. अशातच आता कळवण येथून येवल्यात पैठणी घेण्यासाठी आलेल्या तरुणाचा नायलॉन मांजा गळ्यात अडकल्याने गळा चिरला गेल्याची खळबळजनक नाशिकमधूनच घटना समोर आली आहे. प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. अद्याप कोणतीही कारवाई नायलॉन मांजासंदर्भात करण्यात आलेली नाही, असा आरोप केला जात आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x