मैत्रिणीने बोलाविल्याचा बहाणा करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

 या नराधमास फाशीची शिक्षा करण्याची मागणी केली जात आहे. 

Updated: Dec 16, 2019, 10:00 AM IST
मैत्रिणीने बोलाविल्याचा बहाणा करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार title=

नाशिक : २७ वर्षीय नराधमाने १३ वर्षाच्या बालिकेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. याला पोलिसांनी तात्काळ अटक केली असून पुढील कारवाई सुरु आहे. या घटनेमुळे संतापाची लाट पसरली आहे. या नराधमास फाशीची शिक्षा करण्याची मागणी केली जात आहे. 

नाशिक शहरातील अंबड येथील घटना ताजी असतांना म्हसरूळ येथे अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना समोर आली आहे. मैत्रिणीने बोलाविल्याचा बहाणा करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

पोस्को कायद्यांतर्गत म्हसरूळ पोलिसांत याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २७ वर्षीय नराधम बाजीराव सांगळेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

खाऊचे आमिश दाखवून बलात्कार 

नाशिकच्या अंबड पोलिसांनी या सैतानाला अटक केली आहे. त्याच्या चेहऱ्यावर केलेल्या पश्चातापाचा लवलेशही नाही. कैलास कोकणी असं या नराधमाचं नाव आहे. त्यानं त्याच्या शेजारी राहणाऱ्या एका सात वर्षाच्या मुलीला खाऊचं आमिष दाखवून अत्याचार केले. पीडित मुलीनं झालेला प्रकार घरी सांगितल्यानंतर तिच्या घरच्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून संतापाची लाट उसळली आहे. कायद्याच्या चौकटीत राहून १५ दिवसाच्या आत कठोर कारवाई करा अशी मागणी महिलांनी केली आहे. तातडीनं कारवाई केली तर विकृत मनोवृत्तीच्या लोकांमध्ये जरब बसेल असं मत नाशिककर व्यक्त करत आहेत.